वटपौर्णिमेनिमित्त सौभाग्यवतीला 'या' पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
वटपौर्णिमा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या विवाहित महिला वडाच्या झाडाला फेरे मारतात. यादिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. तसेच नवविवाहित महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला ‘वटपौर्णिमा’ हा सण साजरा केला जातो. तसेच वडाच्या झाडाची पूजा करून पुढील सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते. हा सण नवीन लग्न झालेल्या महिलांसाठी अतिशय खास आहे. आज आम्ही तुम्हाला वटपौर्णिमेनिमित्त सौभाग्यवती आनंदी करण्यासाठी काही खास शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सौभाग्यवती खुश होईल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
Vat Purnima: वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती करा ‘ही’ परिक्रमा, वैवाहिक जीवन होईल सुखी
वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जीवनात आनंदाचा वटवृक्ष डौलत राहो. तुम्हाला हवे ते मिळावे, हीच माझी ईश्वरचरणी मनोभावे मनोकामना, तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
सावित्री पौर्णिमा व्रताच्या निमित्ताने, भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव तुम्हाला त्यांच्या सर्वोत्तम आशीर्वादांनी बरसावेत. तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
वटसावित्री पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर तुमच्या जीवनात सदैव सुख आणि ऐश्वर्य नांदो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
तुमचा संसार वटवृक्षासारखा बहरो, ज्या पतीसाठी तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालता, त्या तुमच्या पती परमेश्वराच्या आयुष्यात सतत ऊर्जा, सकारात्मकता आणि आर्थिक स्थेर्य लाभो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
वटसावित्री पोर्णिमेचा सण प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण.. हा क्षण दररोज तुमच्या आयुष्यात येत राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो आपली दृढ साथ
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
ज्येष्ठांचे आशीर्वाद,
पतीचे प्रेम,
सर्वांची प्रार्थना,
आईची करुणा,
वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
अखंड सौभाग्याचा हा सण तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद घेऊन येवो, संकटे दूर होवोत, सात जन्म एकत्र राहोत.
सप्तपदींच्या सात फेर्यांनी बांधलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मोजन्मी राहो असेच कायम
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी करा या गोष्टींचे दान, कर्जातून होईल मुक्तता
माझी आणि तुझी जोडी कधीही तुटू नये,
तू आणि मी एकमेकांवर कधीही रागावू नये,
आपण दोघे सात जन्म एकत्र घालवू,
वटपौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर तुमच्या जीवनात सदैव सुख आणि ऐश्वर्य नांदो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.






