
लघवीतून संपूर्ण रक्तात पसरेल जीवघेणे इन्फेक्शन! ऑफिसमधील 'या' चुकीच्या सवयींमुळे २८ वर्षीय महिलेचा मृत्यू
२८ वर्षीय महिलेचा मृत्यू कशामुळे झाला?
युटीआय इन्फेक्शन होण्याची कारणे ?
इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
दीर्घकाळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. हे घटक लघवी, घाम आणि शौचा वाटे बाहेर पडून जातात. लघवी होणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. हे चक्र शरीरात कायमच चालू असते. पण बऱ्याचदा ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी महिला लघवीला जाणे टाळतात. जास्त वेळ लघवी रोखून ठेवली जाते. मात्र महिलांची ही सवय शरीरासाठी जीवघेणी ठरते. जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्याच्या शरीरातील अंतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम होतो. अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयींमुळे एका २८ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. महिलेने जास्त वेळ लघवी रोखून धरल्यामुळे संपूर्ण शरीरात संसर्ग पसरला आणि उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. (फोटो सौजन्य – istock)
जास्त वेळी लघवी रोखून धरल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जात नाही. हे घटक शरीरात हळूहळू जमा होण्यास सुरुवात होते. मात्र काही दिवसानंतर शरीरात वाढलेल्या इन्फेक्शनमुळे जीवाला धोका निर्माण होतो. लघवीमध्ये वाढलेले यूटीआय सारखे विषाणू वेळीच बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. अन्यथा हा विषाणू लघवी मार्गातून थेट किडनी आणि नंतर रक्तात पसरतो. आज आम्ही तुम्हाला यूटीआय इन्फेक्शन होण्याची कारणे? यूटीआयपासून बचाव करण्यासाठी उपाय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होती. मात्र प्रवासादरम्यान तिने खूप वेळ लघवी रोखून ठेवल्यामुळे तिला वारंवार ‘युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ होत होते. तिला या संसर्गाची लागण तिसऱ्यांदा झाली होती. तिच्यावर योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. लघवी मार्गात वाढलेले इन्फेक्शन हळूहळू संपूर्ण शरीरात पसरून रक्तात मिसळ्ते. रक्तामध्ये इन्फेक्शन पसरल्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होऊन जातात, ज्यामुळे जीव वाचवणे सुद्धा कठीण होऊन जाते.
लघवी मार्गातील इन्फेक्शन वाढण्याची अनेक कारणे आहेत. कमी पाण्याचे सेवन, नाजूक अवयवांची स्वच्छता न करणे, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे इत्यादी चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. डॉक्टरांच्या मते, कमी पाणी पिण्याची सवय शरीरासाठी घातक ठरते. यामुळे लघवीतील बॅक्टेरियाची एकाग्रता वाढते आणि संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे बाहेर कुठेही गेल्यानंतर सुद्धा भरपूर पाण्याचे सेवन करून वारंवार लघवीला जावे. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होऊन जातो.
कुठेही जाताना किंवा घरातून बाहेर पडताना लघवीला जावे. ही सवय शरीरासाठी फायदेशीर आहे. तसेच कामाच्या ठिकाणी जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नये. यामुळे लघवीत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. लघवी रोखल्यामुळे मूत्राशयावर ताण येतो आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात फॉलो केलेल्या छोट्या मोठ्या सवयी शरीरास घातक ठरतात.
Ans: मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात होणाऱ्या जिवाणूंच्या संसर्गाला मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) म्हणतात.
Ans: लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवीला होणे
Ans: महिलांमध्ये लैंगिक संबंधांमुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो, कारण यामुळे जीवाणू मूत्रमार्गात प्रवेश करू शकतात.