Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे

Upvas Appe Recipe: वटपौर्णिमेच्या सणानिमित्त अनेक विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करत आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. उपवासावेळी काही टेस्टी खावेसे वाटत असेल तर तुम्ही उपवासाचे अप्पे तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2025 | 04:57 PM
Vatpournima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे

Vatpournima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे

Follow Us
Follow Us:

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा एक सण मानला जातो. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतवैकल्य, उपवास करतात. आता उपवास म्हणजे काही साधी गोष्ट नाही, यात अनेक गोष्टी खाण्यास वर्ज्य असतात, अशात तुम्ही फक्त काही निवडक वस्तूंपासूनच तयार केलेले पदार्थ खाऊ शकता. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की उपवासाच्या पदार्थांपासूनच तुम्ही नेहमीचे चवदार पदार्थ देखील बनवू शकता.

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Achaari Paneer Tikka Paratha, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

उपवासाच्या दिवशी रोजचे जेवण न करता काहीतरी चविष्ट आणि पचायला हलके खाण्याची इच्छा होते. अशावेळी उपवासाचे अप्पे ही एक उत्तम आणि पौष्टिक रेसिपी आहे. साबुदाणा, राजगिरा पीठ, वरी तांदूळ अशा उपवासात चालणाऱ्या साहित्यापासून हे अप्पे तयार होतात. हे अप्पे कुरकुरीत, स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारे असल्याने उपवासासाठी हे एक परिपूर्ण नाश्ता ठरतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य 

  • १ कप उकडलेला बटाटा (,मॅश करून)
  • १/२ कप साबुदाणा (भिजवलेला)
  • २ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट
  • २ टेबलस्पून राजगिरा पीठ
  • २ टेबलस्पून सिंघाडा पीठ (ऐच्छिक)
  • १ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • १/२ टीस्पून जिरे
  • १ टेबलस्पून कोथिंबीर (ऐच्छिक)
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • लिंबाचा रस (थोडा)
  • तूप / तेल (अप्पे भाजण्यासाठी)
कृती :
  • उपवासाचे अप्पे तयार करण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेला साबुदाणा मिक्सरमध्ये थोडासा वाटून घ्या (पूर्ण पेस्ट नको).
  • एका भांड्यात उकडलेला बटाटा, वाटलेला साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, जिरे, मिरची, मीठ, लिंबाचा रस, राजगिरा
  • पीठ आणि सिंघाडा पीठ घालून चांगले मिक्स करा
  • आता यात थोडंसं पाणी घालून घट्ट पण थोडंसं मऊसर पीठ तयार करा
  • अप्पे पात्र गरम करून प्रत्येक खोलगट भागात थोडं तेल अथवा तूप घाला
  • तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून प्रत्येक साच्यात घालून झाकण ठेवा
  • मध्यम आचेवर ५-७ मिनिटं शिजवून अप्पे उलटा करून दुसऱ्या बाजूनेही कुरकुरीत होईपर्यंत भाजा
  • तयार झालेले गरम अप्पे दही किंवा शेंगदाण्याचा चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा
  • उपवासाचे अप्पे झटपट, कुरकुरीत आणि आरोग्यदायी नाश्त्यासाठी योग्य पर्याय आहेत

Web Title: Vatpournima 2025 make tasty and upvas special appe at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
2

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.