
Tomato Pithla Recipe: पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत टोमॅटोच पिठलं, नोट करा भन्नाट चवीची रेसिपी
Tomato Pithla Recipe: जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. भाजी, आमटी किंवा उसळ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त ईच्छा होते. अशावेळी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत झणझणीत टोमॅटोच पिठलं बनवून खाऊ शकता. प्रत्येक घरात पिठलं भाकरी हा पदार्थ अतिशय आवडीने बनवून खाल्ला जातो. महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांमधील पिठलं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अतिशय सुंदर लागते. बेसन, टोमॅटोची आंबटसर प्युरी, लसूण, लाल मिरच्या आणि खमंग फोडणी देऊन बनवलेले पिठलं सगळेच खूप आवडीने खातील. कामाच्या धावपळीमध्ये झणझणीत, मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही, अशावेळी झणझणीत टोमॅटोच पिठलं बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – pinterest)