
झणझणीत पदार्थांची आवड आहे? मग घरी बनवा विदर्भ स्टाईल 'पाटवडी रस्सा'; यापुढे चिकन रस्साही पडेल फिका
हा पदार्थ बेसनाच्या पाटवडी आणि मसालेदार रस्स्याचं अप्रतिम मिश्रण आहे. पाटवडी म्हणजे बेसनाचं पीठ वेगवेगळ्या मसाल्यांनी चविष्ट करून वाफवून तयार केलेले चौकोनी तुकडे. हे तुकडे नंतर लालसर रस्स्यात घातले की तयार होते “विदर्भ स्टाईल पाटवडी रस्सा”. हा तिखट, खमंग पदार्थभाताबरोबर किंवा भाकरीसोबत एकदम लज्जतदार लागतो. हा पदार्थ खासकरून नागपूर, अमरावती, अकोला भागात लोकप्रिय आहे. चला तर मग विदर्भाच्या या झणझणीत पदार्थाला घरी बनवण्यासाठी कोणकोणत्या पदार्थाची आवश्यकता लागते ते जाणून घेऊया.
पाटवडीसाठी: