Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा होईल सांगाडा! शरीरात ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास आहारात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2026 | 05:30 AM
Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा होईल सांगाडा! शरीरात 'ही' लक्षणे दिसू लागल्यास आहारात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे हाडांचा होईल सांगाडा! शरीरात 'ही' लक्षणे दिसू लागल्यास आहारात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

विटामिन बी १२ का आवश्यक आहे?
विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?
विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?

विटामिन बी १२ शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. शरीरात लाल रक्तपेशी तयार करणे, मज्जासंस्था आणि नसांचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्याचे काम विटामिन बी १२ करते. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरातील विटामिन बी १२ ची पातळी कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे थकवा, अशक्तपणा, हातपायांना मुंग्या येणे, विसरभोळेपणा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर काहीवेळा मेंदू, नस, हृदय आणि डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या आणि उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि विटामिन बी १२ वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?(फोटो सौजन्य – istock)

पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा थर झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, राहाल कायमच निरोगी

विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. अतिशय सामान्य वाटणारी पण शरीरासाठी जीवघेणी लक्षणे दिसू लागल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केले जाते. कालांतराने लक्षणे तीव्र झाल्यास शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि खूप जास्त थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते.

मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे हातापायांमध्ये सुई टोचल्यासारखे होते तर काहीवेळा मांडीमध्ये झिणझिण्या, त्वचेमध्ये जळजळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जिभेवर सूज येणे, फोड येणे, सतत छाले पडणे, जीभ लाल होणे, वारंवार तोंड येत असेल तर हे विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे होते. जिभेच्या टिश्यूंना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे वारंवार जिभेला सूज किंवा लाल होऊन वेदना होतात.

विटामिन बी १२ च्या कमतरतेचा थेट परिणाम मेंदूच्या नसांवर होतो. त्यामुळे काम करताना गोधंळ निर्माण होणे, लक्ष केंद्रित करण्यास अडथळे निर्माण होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्वचेचा रंग फिका पडून जातो आणि चेहरा निस्तेज होतो. विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर नसांवरील संरक्षक आवरण कमकुवत होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे विसरभोळेपणा, नैराश्य तर काहीवेळा डिमेंशिया सुद्धा होऊ शकतो.

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे:

सगळ्यात आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने Vitamin B12 Serum Test करून घेणे आवश्यक आहे. यामुळे विटामिन किती कमी झाले आहे हे समजून येईल. विटामिन बी १२ ची कमतरता खूप जास्त वाटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध किंवा इंजेक्शन्स घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात दूध, दही, पनीर, लोणी आणि चीज, अंडी, मासे, ओट्स, तृणधान्ये, सोया मिल्क इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास विटामिन बी १२ ची कमी झालेली पातळी भरून निघेल आणि आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vitamin B12 ची कमतरता झाल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

    Ans: Vitamin B12 ची कमतरता झाल्यास थकवा, अशक्तपणा, हात-पायांना मुंग्या येणे, चक्कर येणे, स्मरणशक्तीवर परिणाम आणि रक्तातील लाल पेशी कमी होणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.

  • Que: Vitamin B12 कमी असल्याची कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: सतत थकवा जाणवणे, त्वचा फिकट दिसणे, केस गळणे, जीभ दुखणे, हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: Vitamin B12 वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: दूध, दही, चीज, अंडी, मासे, मांस तसेच Vitamin B12 फोर्टिफाइड पदार्थांचा आहारात समावेश करता येतो. शाकाहारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेण्याचा विचार करू शकतात.

Web Title: Vitamin b12 deficiency can leave your bones brittle if you notice these symptoms include nutritious foods in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • important vitamins
  • vitamin b12
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या
1

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ पॉवरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी
2

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीराचा सांगाडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ पॉवरफुल पदार्थांचे सेवन, थकवा होईल कमी

शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य
3

शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.