पोट- मांड्यांवर वाढलेला चरबीचा थर झपाट्याने होईल कमी! उपाशी पोटी नियमित करा 'या' पेयांचे सेवन, राहाल कायमच निरोगी
शरीरावर चरबी वाढण्याची कारणे?
वजन कमी करण्यासाठी कोणती पेय प्यावी?
आल्याचा चहा पिण्याचे फायदे?
धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि वाढलेले वजन अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. अनेकांना वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते तर काहींच्या वजन महिनाभरात सुद्धा कमी होऊन जाते. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी अनेक लोक तासनतास जिम, महागडे डाएट तर काहीवेळा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण करणे टाळतात. असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा वाढू लागतो.(फोटो सौजन्य – istock)
जगभरात वाढलेल्या वजनाच्या समस्येने असंख्य लोक त्रस्त आहेत. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे सुद्धा लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. शरीरात चरबीचा अनावश्यक थर वाढल्यानंतर मधुमेह, खराब कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढून आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे योग्य ते उपाय करून वजन कमी करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पेय प्यायल्यामुळे झपाट्याने वजन कमी होईल, पचनक्रिया निरोगी राहील आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
वजन वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कायमच दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने वाढत्या वजनामुळे कपडे घट्ट होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय आणि महागडे डाएट घेतले जातात. पण त्याऐवजी रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतील. शरीराची चयापचय क्रिया वाढून वजन कमी होईल. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिणे खूप जास्त फायदेशीर ठरेल.
शरीरावर साचून राहिलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे. यासाठी टोपात एक ग्लास पाणी घेऊन त्यात दालचिनीचा छोटा तुकडा घालून उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाण्यात मध किंवा गूळ मिक्स करून सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. दालचिनीमध्ये असलेले फायबर आणि इतर घटक वजन कमी करण्यास मदत करतात.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी आल्याचा चहा प्यावा. गरम पाण्यात किसून घेतलेलं आलं घालून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर पाण्यात ग्रीन टी घालून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर आल्याच्या चहाचे सेवन करा. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते.
Ans: कोमट पाणी, लिंबू पाणी, ग्रीन टी, जिऱ्याचे पाणी किंवा इतर नैसर्गिक पेये सकाळी घेणे काही लोकांना वजन नियंत्रणात मदत करू शकते.
Ans: फक्त एखादे पेय घेतल्याने चरबी झपाट्याने कमी होत नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Ans: सकाळी कोमट पाणी, लिंबू पाणी (साखर न घालता), जिऱ्याचे पाणी किंवा ग्रीन टी यांसारखे पर्याय घेऊ शकता.






