Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहरी भागात वाढतंय जलप्रदूषण, सामान्यांचं आरोग्य धोक्यात; गुणवत्तेवर लक्ष देणं गरजेचं

दिवसेंदिवस प्रदूषण वाढतंय आणि याचा प्रत्यय जलप्रदूषणाच्या बाबतीतही येत आहे. पाण्याचा दर्जा या प्रदूषणामुळे घसरत चालला आहे. शहरी भागांमध्ये सध्या काय स्थिती आहे, आरोग्यावर कसा परिणाम होतोय जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 17, 2026 | 02:04 PM
जलप्रदूषणामुळे काय होतात तोटे (फोटो सौजन्य - iStock)

जलप्रदूषणामुळे काय होतात तोटे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • शहरी भागांमध्ये स्वच्छ पाण्याची समस्या 
  • जलप्रदूषण कसे वाढत आहे 
  • पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावली 
भारतातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम इंदूर, गांधीनगर आणि ग्रेटर नोएडा यांसारख्या भागांमध्ये दिसून येतो. शहरांचा वेगाने होत असलेला विकास, पायाभूत सुविधांवरील ताण आणि नद्यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांवर वाढणारा भार यामुळे अनेक निवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. परिणामी, दीर्घकालीन स्वरूपात सर्वसामान्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

देशभरातील भूजल सर्वेक्षणांमधून असे स्पष्ट झाले आहे की अनेक भागांतील पाण्यात नायट्रेट, फ्लोराइड आणि आर्सेनिक यांसारखी विषारी रसायने व जड धातू आढळून येत आहेत. केंद्रीय भूजल मंडळाच्या माहितीनुसार, भारतातील सुमारे २० टक्के भूजल नमुन्यांमध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. या प्रकारचे प्रदूषक पाण्याचा रंग, रूप किंवा चव बदलत नाहीत, त्यामुळे घरांमध्ये दीर्घकाळ नकळत दूषित पाण्याचा वापर होत राहतो.

वाढते प्रदूषण, वाढता धोका! ही लक्षणे दिसताच समजून जा तुम्हाला झालाय ‘फुफ्फुसांचा कर्करोग’; वेळीच व्हा सावध!

सांडपाण्यामुळेही समस्या 

इंदूरसारख्या शहरांमध्ये पाणीपुरवठ्यातील चढउतार आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याच्या मिश्रणामुळे काही भागांतील पाण्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, गांधीनगर आणि ग्रेटर नोएडा यांसारख्या शहरांमध्ये सातत्याने होणारे बांधकाम, बेसुमार भूजल उपसा आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थेतील कमतरता यांमुळे भूजलावर मोठा ताण येत आहे. हवामानातील बदल आणि शहरी भागांतील असमान जलव्यवस्थापनामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे.

महापालिका सांडपाणी प्रक्रिया आणि वितरण जाळे सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्या तरी, वेगवेगळ्या वसाहतींमध्ये, इतकेच नव्हे तर एकाच इमारतीतील वेगवेगळ्या घरांमध्येही पाण्याच्या शुद्धतेत मोठा फरक आढळतो. पायाभूत सुविधांमधील त्रुटी, योग्य देखभालीचा अभाव आणि स्रोतावर पाणी शुद्धीकरणाच्या अनियमित पद्धती यामुळे केवळ सरकारी पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहणे आता अनेक कुटुंबांसाठी कठीण झाले आहे.

काय सांगतो अभ्यास

घरगुती वॉटर फिल्ट्रेशन प्रणाली पाणी साठवण किंवा वितरणादरम्यान मिसळणारी घाण अडवण्याचे काम करतात. आयआयटी मद्रासच्या एका अभ्यासासह स्वतंत्र वैज्ञानिक चाचण्यांतून असे दिसून आले आहे की साधे किंवा ब्रँड नसलेले फिल्टर पहिल्या १० लिटर पाणी गाळल्यानंतरच निकामी ठरू शकतात. याउलट, प्रमाणित फिल्ट्रेशन तंत्रज्ञान दीर्घकाळासाठी, काही प्रकरणांमध्ये १२,००० लिटरपर्यंत पाणी प्रभावीपणे शुद्ध करू शकते.

ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन

कशी होऊ शकते समस्या दूर 

आधुनिक वॉटर फिल्ट्रेशन तंत्रज्ञान पाण्यातील विविध समस्या दूर करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान पाण्यातील घाण काढून टाकते, विषारी रसायने दूर करते आणि हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट करण्यात मदत करते. स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी सातत्याने उपलब्ध झाल्यास पचनसंस्था मजबूत राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि एकूणच शरीर निरोगी राहते.

केवळ पाण्याच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही, तर त्याच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवरही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. जलप्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. यामध्ये पायाभूत सुविधा सुधारणे, नियामक संस्थांकडून प्रभावी देखरेख आणि घरगुती पातळीवर पाण्याच्या शुद्धतेबाबत सुज्ञ निर्णय घेणे यांचा समावेश होतो. सुरक्षित पिण्याचे पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर शहरी जीवन दीर्घकालीन स्वरूपात अधिक चांगले बनवण्यासाठीही एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Web Title: Water pollution is increasing in urban areas endangering the health of ordinary citizens focusing on water quality is essential

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Health Tips
  • pollution

संबंधित बातम्या

अंशतः गुडघे प्रत्यारोपण ठरतेय Osteoarthritis च्या रुग्णांसाठी वरदान, गुडघेदुखीवर संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नाही भासणार
1

अंशतः गुडघे प्रत्यारोपण ठरतेय Osteoarthritis च्या रुग्णांसाठी वरदान, गुडघेदुखीवर संपूर्ण गुडघा बदलण्याची गरज नाही भासणार

नागरिकांनो व्हा सावध! थंडी आणि प्रदूषणाचा दुहेरी मारा; दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी, हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका वाढला
2

नागरिकांनो व्हा सावध! थंडी आणि प्रदूषणाचा दुहेरी मारा; दिल्लीत हेल्थ इमर्जन्सी, हार्ट अटॅक-स्ट्रोकचा धोका वाढला

60 व्या वर्षीही टिकून राहील 25 सारखी ताकद! पुरुषांसाठी फायदेशीर ठरते ही भाजी; नियमित सेवन स्टॅमिना करते दुप्पट
3

60 व्या वर्षीही टिकून राहील 25 सारखी ताकद! पुरुषांसाठी फायदेशीर ठरते ही भाजी; नियमित सेवन स्टॅमिना करते दुप्पट

बाळाच्या खोलीत हीटर लावण्याआधी हे नक्की वाचा; त्वचा आणि श्वसनावर होऊ शकतो परिणाम
4

बाळाच्या खोलीत हीटर लावण्याआधी हे नक्की वाचा; त्वचा आणि श्वसनावर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.