Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार… अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल ‘चिकन घी रोस्ट’

Chicken Ghee Roast Recipe : कर्नाटकातील मंगळूर येथे चिकन घी रोस्ट हा स्वादिष्ट पदार्थ फार फेमस आहे. तूपात शिजवलेले मसालेदार चिकन अशी या पदार्थाची ओळख आहे. चला हा पदार्थ घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया. 

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2025 | 03:00 PM
Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार... अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल 'चिकन घी रोस्ट'

Weekend Special : सुगंधित अन् मसालेदार... अवघ्या 30 मिनिटांतच बनवा मंगलोरीयन स्टाईल 'चिकन घी रोस्ट'

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्नाटकातील मंगळूर येथे  ‘चिकन घी रोस्ट’ हा पदार्थ फार फेमस आहे
  • तुपात शिजवलेले मसालेदार चिकन अशी या पदार्थाची ओळख आहे
  • हा पदार्थ पाहचा क्षणीच तोंडाला पाणी आणणारा आहे

कोकण आणि दक्षिण भारतातील जेवण म्हटलं की त्यात मसाले, खोबरे आणि तुपाचा मोहक सुगंध असतो. अशाच स्वादांनी भरलेला एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे “चिकन घी रोस्ट.” हा पदार्थ मूळतः कर्नाटकातील मंगळूर परिसरातून आलेला आहे. तिथल्या प्रत्येक घरात आणि रेस्टॉरंटमध्ये याचा सुगंध दरवळत असतो. याच्या नावातच त्याचं सार आहे, भरपूर तुपात भाजलेले चिकन आणि खास मसाल्यांचा तिखट पण मनमोहक संगम. चिकन घी रोस्टचा रंग लालसर असतो, पण त्याची चव फक्त तिखट नसून थोडीशी गोडसर, आंबट आणि सुगंधी असते. हे डिश बनवताना मसाले भाजण्याची प्रक्रिया आणि तुपाचा वापर यामुळे त्याचा चविष्टपणा दुपटीने वाढतो. हा पदार्थ फक्त दिसायलाच नाही तर चावीलाच लाजवाब लागतो. आज आम्ही या लेखात तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मंगळोरी पद्धतीने चिकन घी रोस्ट घरी कसे तयार करायचे ते सांगणार आहोत. चला या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

साहित्य:

चिकन मॅरिनेशनसाठी:

  • चिकन – 500 ग्रॅम (मध्यम तुकडे)
  • दही – ½ कप
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – ¼ टीस्पून

मसाला पेस्टसाठी:

  • सुकी लाल मिरची (ब्यादगी किंवा काश्मिरी) – 10 ते 12
  • धणे – 1 टेबलस्पून
  • जिरे – 1 टीस्पून
  • मेथी दाणे – ¼ टीस्पून
  • काळीमिरी – 6 ते 8
  • लवंग – 2
  • दालचिनी तुकडा – 1 इंच
  • लसूण पाकळ्या – 8 ते 10
  • चिंच – लिंबाएवढी (भिजवलेली)

शिजवण्यासाठी:

  • तूप – 4 ते 5 टेबलस्पून
  • कढीपत्ता – काही पाने
  • मीठ – चवीनुसार

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत अख्या मुगाचा खाकरा, नोट करून घ्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुऊन त्यात दही, लिंबाचा रस, हळद आणि मीठ टाकून नीट मिक्स करा. ते किमान एक तास मॅरिनेट होऊ द्या.
  • कढईत धणे, जिरे, मेथी दाणे, काळीमिरी, लवंग आणि दालचिनी कोरडे भाजून घ्या. सुगंध आला की गॅस बंद करा. थोडं थंड झाल्यावर या मसाल्यांसोबत लाल मिरच्या, लसूण आणि चिंच घालून पाणी न वापरता घट्ट पेस्ट तयार करा.
  • एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करा. त्यात कढीपत्ता घाला. नंतर मॅरिनेट केलेले चिकन घालून 8 ते 10 मिनिटे परतून घ्या. चिकन थोडं शिजल्यावर त्यात तयार केलेला मसाला घाला.
  • मसाला चिकनवर नीट मिक्स करा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा. तुपात मसाला हळूहळू भाजला गेला की त्याचा रंग गडद लाल होतो आणि तुपाचे बुडबुडे दिसू लागतात.
  • मसाला चिकनला पूर्ण लागला की गॅस कमी करा आणि 10 मिनिटे परतत शिजवा. चिकन कोरडे पण रसाळ होईल.
  • गॅस बंद केल्यावर वरून थोडं तूप घालून मिसळा. सुगंधित चिकन घी रोस्ट सर्व्ह करण्यास तयार आहे.
  • हा पदार्थ साध्या गरम भातासोबत, नेर डोसे, पराठा किंवा फुलक्यासोबत उत्कृष्ट लागतो. त्याची चव अधिक खुलते जेव्हा तो ताज्या तुपात बनवला जातो. हा डिश बनवताना मसाला नीट भाजणे आणि त्याची योग्य प्रमाणात आंबट-तिखट चव राखणे हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.
  • चिकन घी रोस्ट हा फक्त एक पदार्थ नाही, तर दक्षिण भारतीय पाककलेचा अनुभव आहे. त्याचा प्रत्येक घास तुपाच्या समृद्ध सुगंधाने आणि मसाल्यांच्या जोमदार चवीने मन जिंकतो. हा पदार्थ एकदा घरी बनवलात की पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होते.

Web Title: Weekend special know how to make manglorian style chicken ghee roast at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या
1

बिर्याणी लव्हर्स असाल तर कर्नाटकची फेमस ‘चिकन डोने बिर्याणी’ ट्राय करायलाही हवी! रेसिपी जाणून घ्या

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत अख्या मुगाचा खाकरा, नोट करून घ्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ
2

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत अख्या मुगाचा खाकरा, नोट करून घ्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ

उरलेल्या भातापासून काय बनवावे सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मऊ- जाळीदार उत्तपा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर
3

उरलेल्या भातापासून काय बनवावे सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मऊ- जाळीदार उत्तपा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर

झणझणीत पदार्थांची आवड आहे? मग घरी बनवा विदर्भ स्टाईल ‘पाटवडी रस्सा’; यापुढे चिकन रस्साही पडेल फिका
4

झणझणीत पदार्थांची आवड आहे? मग घरी बनवा विदर्भ स्टाईल ‘पाटवडी रस्सा’; यापुढे चिकन रस्साही पडेल फिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.