Chicken Donne Biryani Recipe : ह्या बिर्याणीचा खासपणा म्हणजे तिचा हिरवा मसाला, जो ना फार तिखट असतो. साधेपणा, नैसर्गिक चव आणि सुगंध, हेच चिकन डोने बिर्याणीचं वैशिष्ट्य आहे.
या बिर्याणीची चव इतर बिर्याणीपेक्षा थोडी हटके असते
साधी, सुगंधित आणि पारंपरिक मसाल्यांचा मिलाफ या बिर्याणीला खास बनवतो
बिर्याणी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. भारतात बिर्याणीचे अनेक प्रकार आहेत, हैदराबादी, लखनवी, कोल्हापुरी, पण बेंगळुरुची “चिकन डोने बिर्याणी” ही एक वेगळीच खासियत आहे. ‘डोने’ म्हणजे पाने किंवा बाऊलसारखी डबी, ज्यात बिर्याणी सर्व्ह केली जाते. ह्या बिर्याणीचा स्वाद तिच्या मसाल्यांमुळे, पुदिना-कोथिंबिरीच्या हिरव्या चवीमुळे आणि कोमट तांदळाच्या सुगंधामुळे विशेष असतो. कर्नाटकातील मिलिटरी हॉटेल्समध्ये ही बिर्याणी प्रसिद्ध आहे आणि ती साध्या तरीही रसरशीत मसाल्यांमुळे मन जिंकते. याची रेसिपीआज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया, ही झणझणीत, सुगंधी आणि स्वादिष्ट चिकन डोने बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची.