Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

नीट-यूजी पेपरफुटीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. संपूर्ण देशभरातील विद्यार्थी आंदोलनासाठी उपस्थित झाले होते. त्यानंतर उपस्थित आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला. चला तर जाणून घेऊया अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? अश्रूधूर नळकांड्याचा शरीरावर होणारा परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2026 | 03:37 PM
दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

दिल्लीमधील आंदोलनात वापरण्यात आलेले अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय?
अश्रूधूर नळकांड्याचा शरीरावर होणारा परिणाम:
अश्रूधूर सोडल्यानंतर लगेच काय करावे?

मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नीट-यूजी पेपरफुटीबद्दल जबाबदारी निश्चित करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलन केले. या आंदोलनात हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो आंदोलकांनी संसद भवनाकडे मोर्चा काढला.त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखले. उपस्थित आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. याशिवाय आंदोलन स्थळी सोडण्यात आलेल्या अश्रुघुरांचे नळकांडे 2020 मध्येच एक्सपायर झाले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अश्रुघुरासोबत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दिल्लीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. चला तर जाणून घेऊया अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय? अश्रूधूर नळकांड्याचा शरीरावर होणारा परिणाम, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

मांसाहार खाल्ल्यामुळे मूळव्याध होतो का? सर्जरीशिवाय मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात करा बदल, पोट होईल स्वच्छ

अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय?

दिल्लीतील आंदोलन नियंत्रणात करण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूर नळकांडे सोडण्यात आले होते. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा जमावाला पांगवण्यासाठी याचा वापर केला जातो. अश्रूधूर नळकांडेमध्ये CS गॅस किंवा काही ठिकाणी CN गॅस सारख्या रासायनिक संयुगांचा वापर केला जातो. नळकांडे जमीनीवर सोडल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. हा धूर गर्दीमध्ये सोडल्यानंतर अत्यंत वेगाने सगळीकडे पसरतो. यामुळे डोळे, नाक, घसा आणि श्वसनमार्गात तीव्र जळजळ आणि श्वास कोंड्यासारखा वाटतो.

अश्रूधूर नळकांड्याचा शरीरावर होणारा परिणाम:

  • अश्रूधूर नळकांड्यामुळे डोळ्यांमध्ये तीव्र जळजळ होणे आणि सतत पाणी येते.
  • नाक व घशात आग होते.
  • सतत खोकला येऊन श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात.
  • त्वचेवर जळजळ, लाल रॅश तर काहीवेळा जखम सुद्धा होते.
  • उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याची शक्यता असते.

अश्रूधूर सोडल्यानंतर लगेच काय करावे?

  • जमेल तितक्या लवकर धुरातून बाहेर पडावे.
  • स्वच्छ हवेत गेल्यानंतर शांत श्वास घ्यावा.
  • डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे
  • जास्त डोळे चोळू नये. यामुळे लालसरपणा वाढून डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.
  • श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे, अन्यथा आरोग्य आणखीनच बिघडण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात हाडांच्या वेदना कशामुळे वाढतात? शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढतो आजारांचा धोका

अश्रूधूर नळकांडे का घातक आहेत?

अश्रूधूर नळकांडे सोडल्यानंतर त्याचा परिणाम तात्काळ होतो. काहीवेळा आसपासच्या परिसरात धूर होऊन डोळ्यांमध्ये जळजळ किंवा श्वासाच्या समस्या होतात. पण बंद जागेत अश्रूधूर नळकांडे सोडल्यास त्याचे परिणाम अतिशय घातक होतात. श्वासाचा आजार झाल्यामुळे फुफ्फुसांना गंभीर हानी पोहचण्याची शक्यता असते. दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनात अश्रूधूर नळकांडे सोडून तिथे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणली जाते. पण काहीवेळा तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अश्रूधूर नळकांडे म्हणजे काय?

    Ans: अश्रूधूर नळकांडे (Tear Gas Canisters) ही कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वापरली जाणारी साधने आहेत. ती फोडल्यानंतर डोळे, नाक आणि श्वसनमार्गाला तीव्र त्रास देणारा रासायनिक धूर पसरतो, ज्यामुळे गर्दी विखुरण्यास मदत होते.

  • Que: आंदोलनांमध्ये अश्रूधूरचा वापर का केला जातो?

    Ans: हिंसक किंवा नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणा अश्रूधूरचा वापर करू शकतात.

  • Que: अश्रूधूरमुळे कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: डोळ्यांत जळजळ, सतत पाणी येणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास, नाक आणि घशात जळजळ तसेच त्वचेवर चुरचुर होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: What are tear gas shells used during protests know their serious effects on the human body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP Protest
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप
3

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
4

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.