
Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा 'या' गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
पॅनिक अटॅकपासून बचाव करण्यासाठी तातडीने करा ‘हे’ उपाय:
पॅनिक अटॅकची लक्षणे?
पॅनिक अटॅक कशामुळे येतो?
Panic Attack: बऱ्याचदा शरीरात अचानक बदल जाणवू लागतात. हृदयाची वाढलेली धडधड, ठोके वाढणे, छातीत अस्वस्थ वाटणे, श्वास घ्याल त्रास होणे, अंगाला घाम फुटणे, तीव्र भीती वाटणे, थरकाप उडणे, चक्कर येणे इत्यादी वेगवेगळी भीतीदायक लक्षणे दिसू लागतात. मनात निर्माण झाल्यामुळे भीतीमुळे संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडून जाते. ज्याचा परिणाम शरीराच्या कार्यांवर होतो. मनावरील ताबा अचानक सुटल्यामुळे चक्कर येणे किंवा तोल गेल्यासारखे वाटू लागते. मात्र ही लक्षणे कोणत्याही सामान्य आजाराची नसून पॅनिक अटॅक आल्यानंतर दिसून येतात. हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मध्ये खूप फरक आहे. मनात वाढलेल्या भीतीमुळे शरीरातील लक्षणे अधिक तीव्र होतात आणि आरोग्य बिघडते. वेळेनुसार लक्षणे वाढत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पॅनिक अटॅक आल्यानंतर बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
पॅनिक अटॅक आल्यानंतर किंवा लक्षणे दिसू लागल्यास शांत राहणे फार आवश्यक आहे. अन्यथा लक्षणे अधिक तीव्र होतात. घाबरल्यासारखे वाटल्यास एखाद्या ठिकाणाहून बाहेर पडून जाण्याऐवजी तिथेच शांतपणे बसून राहा. तात्पुरता त्रास कमी होईल त्यानंतर हळूहळू शरीर सामान्य स्थितीमध्ये पुन्हा येईल. शरीराला सतत सांगत राहा, काही मिनिटांत मी ठीक होईन. याशिवाय शरीरात होणारा प्रत्येक बदल पाहून घाबरू नये.
पॅनिक अटॅक आल्यानंतर जोरात किंवा वेगाने श्वास घेतल्यास चक्कर येणे, सुन्नपणा आणि श्वास कोंडणे इत्यादी त्रास वाढू शकतात. त्यामुळे पॅनिक अटॅक आल्यानंतर श्वासावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे. खूप खोलमोठा श्वास न घेता हळूवार आणि नियमित श्वास घ्यावा आणि बाहेर सोडावा. पोटातून हळूवार श्वास घेतल्यास मज्जासंस्थेतील शिथिलीकरण यंत्रणा सक्रिय होते आणि हृदयाचे ठोके सामान्य होण्यास मदत होते.
डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
छातीत धडधड वाढणे किंवा हृदयाचे ठोके वेगाने वाढणे.
अचानक शरीराला घाम सुटणे
हात किंवा पाय थरथरणे
धाप लागणे किंवा गुदमरल्यासारखे वाटणे.
छातीमध्ये अस्वस्थता किंवा वेदना जाणवू लागणे.
डोके हलके होणे किंवा चक्कर येऊन पडल्यासारखे वाटणे.
Ans: घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी बसावे, हळूहळू आणि नियंत्रित श्वास घ्यावा आणि आजूबाजूच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करून स्वतःला वर्तमान क्षणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
Ans: Panic Attack अचानक सुरू होतो आणि त्याची तीव्रता काही मिनिटांत वाढू शकते. अनेक वेळा लक्षणे हळूहळू कमी होतात; मात्र प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो.
Ans: दोन्हींची काही लक्षणे सारखी असू शकतात. छातीत तीव्र किंवा सतत वेदना, श्वास घेण्यास गंभीर त्रास, बेशुद्धी, थंड घाम किंवा वेदना हात, जबडा किंवा पाठीत पसरणे अशी लक्षणे असल्यास स्वतःहून Panic Attack समजून न घेता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.