
सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
Health Risk: सणोत्सवांचा आनंद, रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र आता सार्वजनिक उत्सवांचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, काही क्षणांच्या थरारासाठी डोळ्यांची दृष्टी आणि कानांची श्रवणक्षमता धोक्यात तर घालत नाही ना, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शक्तिशाली लेझर किरण आणि अतिप्रचंड आवाजामुळे डोळ्याच्या रेटिनाला इजा होण्याबरोबरच कानातील संवेदनाक्षम पेशींना कायमचे नुकसान होऊ शकते, लेझरचा प्रकाश साध्या रोषणाईपेक्षा असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. अधिक केंद्रित असतो. शक्तिशाली लेझर किरण थेट डोळ्यात पडल्यास तो रेटिनावर अत्यंत तीव्रतेने केंद्रित होऊन भाजल्यासारखी इजा करू शकतो. परिणामी दृष्टीसमोर काळा डाग दिसणे, दृष्टी धूसर होणे किंवा कायमचा ‘ब्लाइंड स्पॉट’ निर्माण होण्याचा धोका असतो.(फोटो सौजन्य – AI)
Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास
विशेष म्हणजे सुरुवातीला वेदना न झाल्याने इजा दुर्लक्षित राहू शकते. दुसरीकडे, डीजे, मोठे स्पीकर्स आणि मिरवणुकांतील सततच्या कर्णकर्कश आवाजामुळे कानातील नाजूक पेशींवर ताण येतो.कानात शीळ किंवा भुणभुण होणे, कान बंद झाल्यासारखे वाटणे आणि काही काळ कमी ऐकू येणे ही धोक्याची सुरुवातीची लक्षणे आहेत.वारंवार मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यास आवाजामुळे कायमची श्रवणक्षमता कमी होऊ शकते.
‘सणाचा आनंद जरूर घ्या; मात्र डोळे आणि कान यांच्या आरोग्याची किंमत मोजून नाही.लेझर किरण थेट डोळ्यांकडे वळवू नयेत आणि डीजेच्या स्पीकर्सजवळ दीर्घकाळ उभे राहणे टाळावे.दृष्टीत अचानक बदल किंवा कानात सतत आवाज जाणवत असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,’ असे डॉ. सुपे यांनी सांगितले.उत्सवाचा प्रकाश डोळ्यांसाठी सुरक्षित आणि संगीत कानांसाठी सुखद ठेवणे, हाच या सणासुदीतील खरा आरोग्यदायी संकल्प ठरू शकतो.
रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवाजाची तीव्रता वाढेल, तसा सुरक्षित संपर्काचा कालावधी कमी होत जातो. त्यामुळे स्पीकर्सपासून अंतर ठेवणे, मोठ्या आवाजात जास्त वेळ न राहणे आणि कानांना मध्ये विश्रांती देणे आवश्यक असल्याचे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. तर पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये उत्सवांतील लेझर बीमवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.