लिव्हरसाठी बेस्ट फूड
यकृत अर्थात Liver हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे जो विषारी पदार्थ काढून टाकणे, पचनास मदत करणे आणि पोषक तत्वे साठवणे यासारखी अनेक महत्त्वाची कार्ये करतो. म्हणूनच या अवयवाच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. भारतातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, यकृत खराब होण्यापासून वाचवण्यासाठी आपण 5 अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे.
हे पदार्थ नक्की कोणते आहेत आणि त्याचा लिव्हर चांगले राखण्यासाठी कशा पद्धतीने फायदा होतो ते आपण या लेखातून जाणून घेऊया. डाएटिशियन हे आपल्या आरोग्यासाठी योग्य पदार्थांची निवड सुचवत असतात आणि आयुषीने लिव्हरसाठी काही उत्तम पदार्थ सुचवले आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
ग्रीन टी
लिव्हरसाठी ग्रीन टी चा फायदा
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे लिव्हरला टॉक्सिनपासून वाचवण्यास मदत करतात. त्यात कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे यकृताची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. ग्रीन टी नियमितपणे प्यायल्याने यकृतातील चरबीचा साठा कमी होतो आणि लिव्हरचे आरोग्य सुधारते.
हेदेखील वाचा – Liver Cancer झाल्यास शरीर देतं ‘हे’ संकेत, न ओळखता आल्यास वाढू शकतात समस्या
लसणाचा फायदा
लसणामुळे लिव्हर राहील चांगले
लसणामध्ये एलिसिन आणि सेलेनियम सारखे घटक असतात, जे लिव्हर स्वच्छ करण्यास मदत करतात. हे यकृतातील एंजाइम सक्रिय करते जे विष काढून टाकण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. याशिवाय लसूण यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या दूर होते.
विविध बेरी
यकृत चांगले राहण्यासाठी बेरीज खाव्यात
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरीसारख्या बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे लिव्हरचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यात अँथोसायनिन्स असतात, जे यकृताच्या ऊतींची जळजळ कमी करतात आणि बेरीचे नियमित सेवन केल्याने लिव्हरचे आरोग्य सुधारते. तसंच निरोगी राहण्यास मदत मिळते.
हेदेखील वाचा – भारतामध्ये दर 4 पैकी एक व्यक्ती फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त, काय आहे कारण?
हळद ठरते गुणकारी
लिव्हरसाठी हळद ठरेल वरदान
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे सक्रिय तत्व असते, जे लिव्हरसाठी खूप फायदेशीर असते. कर्क्युमिन एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असणारे घटक आहे, जे यकृताची सूज कमी करते आणि यकृताची कार्यक्षमता सुधारते. हळदीच्या सेवनाने लिव्हरची स्वच्छता आणि संरक्षण होण्यास मदत होते.
अवाकाडो
अवाकाडोचा करा वापर
अवाकाडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे यकृतासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यात ग्लुटाथिओन नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, जे लिव्हरला विषारी पदार्थांपासून वाचवण्यास मदत करते. अवाकाडोच्या नियमित सेवनाने लिव्हरची जळजळ कमी होते आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.