Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नखांवर पांढरे डाग कशामुळे येतात? विटामिनची कमतरता नसून आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

नखांवर आलेल्या पांढऱ्या डागांकडे दुर्लक्ष करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. नखांवर पांढरे चट्टे शरीरसंबंधित गंभीर आजारांचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 17, 2026 | 08:41 AM
नखांवर पांढरे डाग कशामुळे येतात? विटामिनची कमतरता नसून आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

नखांवर पांढरे डाग कशामुळे येतात? विटामिनची कमतरता नसून आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका

Follow Us
Close
Follow Us:

नखांवर पांढरे चट्टे कशामुळे येतात?
नखांची काळजी कशी घ्यावी?
नखांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ प्रभावी?

नखे अतिशय नाजूक असतात. त्यामुळे नखांची काळजी घेणे आवश्यक आहे. नख सुंदर दिसावी म्हणून अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. कधी नेल्स एक्सटेंशन तर कधी जेल पॉलिश इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण शरीरसंबंधित निर्माण झालेल्या आजारांची लक्षणे नखांवर सुद्धा दिसू लागतात. नखांवर पांढरा थर दिसणे, नखं सतत तुटणे, नखांची बाजूची त्वचा सहज निघून येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. नखांवर दिसणारे पांढरे ठिपके काहीवेळा कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली असेल, असे अनेकांना वाटते. पण कॅल्शियमची कमतरता नसून नखांना झालेली दुखापत, ॲलर्जी, बुरशीजन्य संसर्ग किंवा काही वेळा लिव्हर व किडनीच्या आजारांमुळे नखांचे आरोग्य बिघडून जाते. नखांवर पांढरे डाग कॅल्शियमच्या अभावामुळे नाहीतर लिव्हर आणि किडनीचे आजार झाल्यानंतर दिसून येणारी अतिशय गंभीर लक्षणे आहेत. त्यामुळे नखांसंबंधित दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

हाडांमध्ये वाढलेल्या सामान्य वेदना असू शकतात Bone Cancer चे संकेत, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

नखांची वाढ शरीरातील मेटाबॉलिझम क्रिया आणि रक्तभिसरणावर अवलंबून असते. ज्यावेळी नखांच्या मूळ भागाला इजा पोहचते किंवा शरीरात कोणत्याही जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते, तेव्हा नखे पांढरी किंवा काळी पडू लागतात. नखांच्या पेशीमध्ये हवेचे बुडबुडे किंवा पांढरट प्रथिने जमा होऊन नखांमध्ये पांढरा थर दिसू लागतो. नखांमध्ये दिसून येणारा बदल शरीरातील गंभीर आजारांचे संकेत देतो. त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नये.

नेलपॉलिश, रिमूव्हर किंवा नेल हार्डनरमधील हानिकारक रसायनामुळे नख पांढरी पडण्याची शक्यता असते. याशिवाय काहीवेळा नखांना बुरशीजन्य आजारांची लागण सुद्धा होते. तुमची नखं पूर्णपणे पांढरी झाली असतो तर लिव्हरसबंधित आजाराचे संकेत आहे. लिव्हर निकामी झाल्यानंतर किंवा ‘अल्ब्युमिन’ कमी झाल्यानंतर नखं पांढरी पडतात. नखांवर आलेले पांढरे चट्टे किडनीचे आजाराचे संकेत देतात. तर काहीवेळा नखांच्या कडा पांढऱ्या किंवा गुलाबी दिसतात, ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.

मासिक पाळीच्या रक्तामुळे कोणते आजार वाढतात? संसर्गापासून बचाव करण्यासाठी ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी

नखांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपाय:

दैनंदिन आहाराचा परिणाम नखांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात झिंक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. पालेभाज्या, सुका मेवा, फळे, कडधान्य, दूध, दही आणि विटामिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय नखांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. नेलपॉलिशचा अतिवापर करणे टाळावे. नखांवर मॉइश्चरायझर किंवा खोबऱ्याचे तेल लावावे. यामुळे नखांच्या आजूबाजूची त्वचा हायड्रेट राहते. नखांना कोणतीही दुखापत झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नखे मजबूत कशी करावी?

    Ans: दररोज नखांवर आणि क्युटिकल्सवर (cuticles) खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावा.

  • Que: नखे वारंवार तुटतात, काय करावे?

    Ans: नखे खूप कमकुवत असतील तर ती लहान ठेवा, जेणेकरून ती अडकणार नाहीत.

  • Que: पिवळी पडलेली नखे कशी स्वच्छ करावी?

    Ans: कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस टाकून त्यात १० मिनिटे हात भिजवून ठेवा, यामुळे नखे स्वच्छ व पांढरी होतात.

Web Title: What causes white spots on nails the risk of this serious illness may be health related rather than vitamin deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:41 AM

Topics:  

  • health issue
  • Nail Care
  • Nails

संबंधित बातम्या

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम
1

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम

८६ वर्षीय महिलेवर हिप फ्रॅक्चर शस्त्रक्रिया यशस्वी! गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका दिवसात चालण्यास सुरुवात
2

८६ वर्षीय महिलेवर हिप फ्रॅक्चर शस्त्रक्रिया यशस्वी! गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका दिवसात चालण्यास सुरुवात

ल्युपसमुळे होणाऱ्या आर्थरायटिस आणि रूमेटॉईड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय आहे फरक
3

ल्युपसमुळे होणाऱ्या आर्थरायटिस आणि रूमेटॉईड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय आहे फरक

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
4

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.