Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Diya Lighting Tips: वारा आला, तरी दिवा विझणार नाही? नेलपेंटच्या ‘या’ भन्नाट ट्रिकची होतेय चर्चा

Diwali Diya Lighting Tips: दिवाळीत घराच्या दारात, खिडकीत किंवा गॅलरीत पणत्या लावताना वाऱ्यामुळे त्या वारंवार विझतात. यावर उपाय म्हणून सोशल मीडियावर वातीच्या टोकाला नेलपेंट लावण्याची एक अनोखी ट्रिक व्हायरल होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 06, 2026 | 11:30 AM
Diwali Diya Lighting Tips (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Diwali Diya Lighting Tips (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेलपेंटची अनोखी ट्रिक व्हायरल
  • पणती विझू नये म्हणून 3 सोपे उपाय
  • दिवे लावताना सुरक्षिततेची काळजी घ्या

दिवाळी आली की घरात वेगळीच धावपळ असते. घर साफ करायचं, सजवायचं, अंगणात पणत्या लावायच्या. संध्याकाळी दारात, खिडकीत, गॅलरीत पणत्या लावल्या की घर कसं लख्ख उजळून निघतं. पण एक मोठा त्रास असतो, बाहेरून वारा आला की पणती विझते.

पुन्हा पेटवा, परत विझते. असं सारखं सारखं करून कंटाळा येतो. यंदाच्या दिवाळीत हाच त्रास होत असेल तर सोशल मीडियावर एक वेगळीच ट्रिक फिरतेय. ती बघून सगळे म्हणतायत, अरे हे खरंच होतं का? Diwali Diya Lighting Tips:

नेलपेंट लावून पणती पेटवायची ट्रिक काय आहे?

Renuka’s Marathi Kitchen Katta यांनी त्यांच्या पेजवर एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की वातीच्या टोकाला नेलपेंट लावा. वेगवेगळ्या रंगाचं नेलपेंट लावायचं, ते थोडा वेळ सुकू द्यायचं आणि मग दिवा पेटवायचा. त्यांचं म्हणणं आहे की असं केलं तर वारा आला तरी दिवा विझत नाही, जास्त वेळ तेवत राहतो.

व्हिडिओ बघून बऱ्याच जणींनी ही ट्रिक करून पण बघितली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेलपेंट ही ज्वलनशील गोष्ट आहे. म्हणजे ती लगेच पेट घेऊ शकते. त्यामुळे ही ट्रिक करताना जरा जपूनच करायला हवी. आगीशी खेळ नको.

नवीन पणत्या आधी स्वच्छ करा

आपण बाजारातून नवीन मातीच्या पणत्या आणतो, त्या तशाच वापरू नका. आधी त्यांच्यावरची धूळ, माती काढून टाका. पाण्याने धुवून घ्या आणि कोरड्या फडक्याने पुसून पूर्ण वाळू द्या. पणतीमध्ये जर थोडं पण पाणी किंवा ओलावा राहिला तर तेल नीट बसत नाही. दिवा पण नीट पेटत नाही. त्यामुळे पणती एकदम कोरडी झाल्यावरच त्यात तेल टाका.

Dhanteras 2026: आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचा लाभ होवो! प्रियजनांना द्या धनत्रयोदशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, पाठवा खास संदेश

पणती विझू नये म्हणून सुरक्षित उपाय काय आहेत?

नेलपेंटची ट्रिक करायची नसेल तर दुसरे सोपे आणि सुरक्षित उपाय पण आहेत. ते करून बघा.

1. काचेचं कव्हर वापरा
बाहेरच्या पणतीवर काचेचं कव्हर ठेवा किंवा कंदिलासारखा बंद दिवा वापरा. त्यामुळे थेट वारा लागत नाही आणि ज्योत शांत तेवते. पण ज्योत आणि काचेमध्ये थोडं अंतर ठेवा, नाहीतर काच गरम होईल.

2. वात नीट ठेवा
खूप मोठी वात लावली तर ज्योत मोठी होते आणि तेल पण लवकर संपतं. खूप छोटी वात लावली तर दिवा लवकर विझतो. त्यामुळे पणतीच्या आकाराला शोभेल अशी मध्यम कापसाची वात वापरा.

3. पणती ठेवायची जागा महत्वाची
खिडकीच्या अगदी कडेला, दरवाजाजवळ जिथे जोराचा वारा येतो तिथे पणती ठेवू नका. सपाट, स्थिर जागेवर ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, पडदे, कागदाची सजावट, फुलं यापासून पणती लांब ठेवा. नाहीतर अपघात होऊ शकतो.

Diwali Eye Safety: दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी ‘या’ टिप्स करा फाॅलो

शेवटी एक सांगणं

दिवाळीत घर सजवणं जितकं महत्वाचं आहे, तितकीच सुरक्षितता पण महत्वाची आहे. सोशल मीडियावर रोज नवीन नवीन जुगाड येत असतात. सगळेच जुगाड घरी करून बघायला हवेत असं नाही. जिथे आग, तेल, मेणबत्ती आणि केमिकलचा संबंध येतो तिथे तर जास्तच काळजी घ्या.नेलपेंटची ट्रिक भारी वाटत असली तरी आधी एका पणतीवर करून बघा, लांबून बघा, आणि मगच सगळ्या पणत्यांना लावा. दिवाळी आनंदाची जावी, टेन्शनची नको.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पणतीच्या वातीला नेलपेंट लावण्याची ट्रिक काय आहे?

    Ans: वातीच्या टोकाला वेगवेगळ्या रंगांचे नेलपेंट लावून ते सुकवल्यानंतर पणती पेटवण्याची ट्रिक व्हिडिओमध्ये दाखवली आहे.

  • Que: नेलपेंट लावून पणती पेटवणे सुरक्षित आहे का?

    Ans: नाही. नेलपेंट ज्वलनशील असल्याने आगीचा धोका निर्माण होऊ शकतो.

  • Que: वाऱ्यामुळे पणती विझू नये म्हणून काय करावे?

    Ans: काचेचे योग्य कव्हर वापरा, मध्यम आकाराची वात ठेवा आणि पणती वाऱ्यापासून सुरक्षित जागी ठेवा.

Web Title: Diwali diya nail polish viral trick safety tips rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • lifestlye tips
  • lifesytyle
  • Marathi News
  • Nails

संबंधित बातम्या

CA Foundation Result 2026: प्रतीक्षा संपली! आज सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर होणार; ‘या’ लिंकवर पाहा स्कोरकार्ड!
1

CA Foundation Result 2026: प्रतीक्षा संपली! आज सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर होणार; ‘या’ लिंकवर पाहा स्कोरकार्ड!

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
2

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज
3

Gold Price Prediction 2026: सोने खरेदीची हीच योग्य वेळ? घसरणीनंतर पुन्हा मोठी उसळी घेण्याचा अंदाज

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!
4

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.