
महिलांमध्ये का वाढतोय UTI इन्फेक्शनचा धोका?
युटीआय इन्फेक्शनची लक्षणे?
युटीआय इन्फेक्शन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
इन्फेक्शन झाल्यानंतर कोणते आजार होतात?
सर्वच महिला स्वतःच्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करतात. नातेसंबंध, घरातील कामे, मानसिक तणाव, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिला कायमच आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. वाढत्या वयात महिलांना सहज कोणत्याही आजाराची लागण होते. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातील कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, मात्र कालांतराने शरीरात अनेक बदल होतात. पण या बदलांकडे सुद्धा महिला दुर्लक्ष करतात. महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे UTI. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीरातील प्रत्येक छोट्या मोठ्या अवयवांवर लगेच दिसून येतात. मूत्रपिंड, मूत्रनलिका, मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांना इन्फेक्शनची लागण होते. (फोटो सौजन्य – istock)
यूटीआय इन्फेक्शन प्रामुख्याने मूत्रमार्गात होते, पण वेळीच लक्ष न दिल्यास किडनीपर्यंत पसरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे लघवीमध्ये होणाऱ्या बदलांकडे आणि वारंवार येणाऱ्या तापकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. यूटीआय इन्फेक्शन प्रामुख्याने महिलांचं होते. आज आम्ही तुम्हाला यूटीआय म्हणजे काय? यूटीआय होण्याची कारणे? यूटीआय इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दैनंदिन आहारातील बदल, पाण्याची कमतरता आणि अंतर्गत आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे यूटीआय इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. दिवसभरात ३ लिटर पेक्षा कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे नाजूक अवयवांना हानी पोहचते. जास्त वेळ लघवी थांबवून ठेवणे म्हणजे रोगाला आमंत्रण देणे असे कायमच बोलले जाते. लैंगिक संबंधांनंतर स्वच्छता न राखणे, घट्ट किंवा सिंथेटिक कपड्यांचा वापर, ओलसर अंडरवेअर दीर्घकाळ घालणे इत्यादी गोष्टींमुळे जंतू वाढतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, गर्भधारणा, हार्मोन्समधील बदल, मेनोपॉज, किडनी स्टोन किंवा कॅथेटरच्या अतिवारापामुळे युटीआय इनफेक्शन वाढून आरोग्य बिघडते.
वारंवार लघवीला जावेसे वाटणे
प्रत्येक वेळी थोडी थोडी लघवी होणे
लघवी करताना वाढलेली जळजळ आणि वेदना
लघवीचा रंग गडद होणे.
कंबरदुखी, थकवा किंवा सौम्य ताप येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे महिला कायमच दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आजारांचा धोका कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातो. युटीआय इन्फेक्शनचा धोका मधुमेह, किडनी आजार, गर्भवती महिलांना होण्याची शक्यता असते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कोणतेही इन्फेक्शन झपाट्याने वाढते. तसेच कायमच दुर्लक्ष केल्यास हे इन्फेक्शन रक्तामध्ये पसरते.
Ans: मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय किंवा मूत्रवाहिनी यांसारख्या मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागामध्ये होणारा संसर्ग म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI).
Ans: लघवी करताना तीव्र वेदना किंवा आग जाणवते.
Ans: बहुतेकदा आतड्यांतील जीवाणू मूत्रमार्गातून प्रवेश करतात आणि मूत्राशयात वाढतात.