घशात साचून राहिलेला कोरडा कफ क्षणार्धात पडून जाईल बाहेर! एक चमचा मधात मिक्स करा 'हा' पिवळा पदार्थ
खोकला कमी करण्यासाठी उपाय?
मध, तूप खाण्याचे फायदे?
थंडीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार झपाट्याने पसरतात. सर्दी, खोकला, ताप, उलट्या इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे कोरडा खोकला किंवा छातीमध्ये कफ जमा होतो. छातीमध्ये जमा झालेल्या कफामुळे छातीमध्ये वेदना होणे, झोपल्यानंतर कोरडा खोकला येणे, घशात कफ साचून राहणे यांसारख्या समस्या उद्भवतात. कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती पदार्थांच्या सेवनामुळे छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर पडून जातो आणि घशात वाढलेली खवखव दूर होते. सोशल मीडियावर अनेक घरगुती उपाय कायमच व्हायरल होत असतात. काही उपाय शरीरासाठी प्रभावी ठरतात तर काही शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याऐवजी योग्य पडताळणी करावी. (फोटो सौजन्य – istock)
महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम, त्वचा दिसेल चमकदार
कोरड्या खोकल्यामुळे रात्री व्यवस्थित झोप येत नाही. वारंवार येणाऱ्या खोकल्यामुळे छातीत वेदना किंवा घशात वेदना होणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. आज आम्ही तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी चमचाभर मधात कोणते पदार्थ मिक्स करून खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे घशात वाढलेली जळजळ कमी होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
प्रत्येक स्वयंपाक घरात मध असतेच. मधाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले घटक शरीरातील विषाणू नष्ट करतात. मधात आढळून येणारे नैसर्गिक एन्झाइम्स घशात वाढलेली जळजळ आणि सूज कमी करतात. श्वसन नलिकेत साचलेला घट्ट कफ सैल करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक चमचा मधाचे सेवन करावे. यामुळे छातीत जमा झालेला कफ मोकळा होईल. रात्री येणाऱ्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मधाचे सेवन करावे.
खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी मधात तूप, हिंग आणि थोडी हळद पावडर मिक्स करून घ्या. तयार केलेले चाटण कोमट पाण्यासोबत सेवन करा. यामुळे छातीत जमा झालेला कोरडा कफ नष्ट होईल आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील. कोरडा खोकला कायमच रात्रीच्या वेळी येतो. त्यामुळे चाटण रात्री झोपण्याआधी घ्यावे. यामुळे लवकर प्रभाव दिसून येईल. सकाळी उठल्यानंतर घसा मोकळा आणि स्वच्छ होईल.
Dolo चा ओव्हरडोस लिव्हरसाठी ठरेल अतिशय घातक! चुकूनही करू नका सेवन, शरीरात दिसतील ‘ही’ गंभीर लक्षणे
हळदीमध्ये नैसर्गिक अँटी-बायोटिक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे संसर्गांशी लढण्यास ताकद मिळते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन खोकल्यात वाढलेले विषाणू नष्ट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे चाटण तयार करताना न चुकता हळदीचा वापर करावा. तसेच हळद तुम्ही तुपासोबत सुद्धा घेऊ शकता. हळदीच्या सेवनामुळे तात्काळ फरक दिसून येईल.
Ans: सर्दी हा एक सामान्य, विषाणूजन्य संसर्ग आहे जो नाक, घसा आणि सायनसवर परिणाम करतो.
Ans: नाक बंद किंवा वाहणे, शिंका येणे. घसा खवखवणे.
Ans: भरपूर पाणी, सूप आणि हर्बल चहा प्या. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्या.






