Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक

What is Analogue Paneer how its made: अॅनालॉग पनीर म्हणजे काय, हे कसे तयार केले जाते आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 06, 2026 | 05:46 PM
Analogue Paneer: तुम्हीही खात नाही ना बनावट पनीर? कसे तयार होते; आरोग्यासाठी किती धोकादायक
Follow Us
Follow Us:
  • अॅनालॉग पनीर म्हणजे नेमके काय?
  • अॅनालॉग पनीर कसे तयार केले जाते?
  • आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम
पनीर हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक लोकप्रिय भाग आहे. परंतु, अलीकडच्या काळात बाजारात मिळणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः ‘अॅनालॉग पनीर’ या नावाने विकल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पारंपरिक पनीर हे दुधापासून तयार केले जाते, मात्र अॅनालॉग पनीरमध्ये दूध किंवा दुधातील फॅटऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर अन्नघटकांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची चव आणि पोत पनीरसारखी वाटली तरी त्याचे पोषणमूल्य वेगळे असते. अलीकडेच, महाराष्ट्र सरकारने अॅनालॉग चीजच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे. आता अनेक लोकांना प्रश्न पडला आहे की अॅनालॉग चीज म्हणजे काय, ते कसे तयार केले जाते आणि ते नेहमीच्या पनीरपेक्षा कसे वेगळे असते. जाणून घेऊयात.

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

अॅनालॉग पनीर म्हणजे नेमके काय?

अॅनालॉग पनीर हे पारंपरिक पनीरचा पर्याय म्हणून तयार केलेले नॉन-डेअरी उत्पादन आहे. हे उत्पादन तयार करताना दुधाऐवजी वनस्पतीजन्य फॅट, स्टार्च आणि इतर प्रक्रिया केलेले घटक वापरले जातात. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. मात्र, ग्राहकांना योग्य माहिती न देता ते सामान्य पनीर म्हणून विकले गेल्यास दिशाभूल होऊ शकते.

अॅनालॉग पनीर कसे तयार केले जाते?

अ‍ॅनालॉग पनीर बनवण्यासाठी वनस्पती तेल किंवा चरबी, स्टार्च, सोया किंवा इतर वनस्पतीजन्य फॅट आणि चव आणि पोत टिकवून ठेवणारे पदार्थ वापरले जातात. हे सर्व एकत्र मिसळल्याने एक बनावट पनीर तयार होतो.

आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम

तज्ज्ञांच्या मते, काही अॅनालॉग पनीर उत्पादनांमध्ये हायड्रोजनेटेड फॅट, ट्रान्स फॅट किंवा चरबीचे प्रमाण जास्त असू शकते. अशा घटकांचे वारंवार सेवन केल्यास हृदयविकार, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी उत्पादनावरील घटकांची माहिती तपासणे आवश्यक आहे.

पनीर आणि अॅनालॉग पनीरमधील फरक कसा ओळखावा?

खऱ्या पनीरला सहसा दुधाळ सुगंध आणि मऊ पोत असतो.

  • अ‍ॅनालॉग पनीर अधिक रबरासारखे किंवा असामान्य पोताचे असू शकते.
  • पॅकबंद चीज विकत घेताना, लेबलवरील घटक पदार्थ नक्की वाचा.
  • पनीर फक्त विश्वासार्ह ब्रँड्स किंवा प्रमाणित दुकानांमधूनच खरेदी करा.
  • उत्पादनात दूधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर पर्यायी घटकांचा उल्लेख असल्यास ते अॅनालॉग पनीर असू शकते.
  • काही प्रयोगशाळा-आधारित किंवा आयोडीन चाचण्यांद्वारेही फरक ओळखता येतो.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच पनीर खरेदी करावे, पॅकेजवरील घटक, उत्पादन तारीख आणि लेबल तपासावे. शंका असल्यास संबंधित अन्न सुरक्षा यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी. ग्राहकांना योग्य माहिती मिळावी आणि सुरक्षित अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न सुरक्षा यंत्रणा अशा उत्पादनांवर लक्ष ठेवत आहेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Fatty Liver: शरीर देतंय ‘हे’ संकेत? फॅटी लिव्हरची सुरुवात तर नाही ना; अजिबात दुर्लक्षित करू नका

Web Title: What is analogue paneer how its made know difference between paneer analogue panner fda ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • FDA Action
  • Food Safety
  • paneer

संबंधित बातम्या

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
1

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित
2

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.