Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hematocrit Test का आणि कधी करावी? कोणत्या आजाराचे होते निदान

काही टेस्ट अशा असतात ज्याची नावंही ऐकलेली नसतात. मात्र Anemia सारख्या आजारांसाठी हेमेटोक्रिट टेस्ट नावाची चाचणी गरजेची असते. विविध रोगांचे लवकर निदान केल्याने त्यावर उपाय करणे सोपे होते. यासाठी अधिक माहिती घेऊया तज्ज्ञांकडून.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 24, 2024 | 05:36 PM
हेमेटोक्रिट टेस्ट म्हणजे काय

हेमेटोक्रिट टेस्ट म्हणजे काय

Follow Us
Close
Follow Us:

रक्तातील रेड ब्लड सेल्सचे (RBC) प्रमाण मोजण्यासाठी हीमेटोक्रिट चाचणी एक महत्त्वपूर्ण चाचणी आहे. ही कंप्लीट ब्लड काऊंट (CBC) चा एक महत्वपूर्ण भाग असून त्यामुळे तुमच्या आरोग्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते. विविध रोगांचे लवकर निदान आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने हेमेटोक्रिट चाचणी का आणि कधी करावी हे समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. अजय शहा, व्यवस्थापकीय संचालक, न्यूबर्ग अजय शाह प्रयोगशाळा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तसंच ही चाचणी का करावी आणि याचे महत्त्वही त्यांनी या लेखातून सांगितले आहे, जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)  

हिमेटोक्रिट चाचणी का करावी?

चाचणी करणे का आवश्यक आहे

अ‍ॅनिमिया आणि पॉलिसिथेमियाचे निदानः

अ‍ॅनिमिया: हेमेटोक्रिट पातळी कमी असल्यास अॅनिमिया होऊ शकतो, असा आजार ज्यामध्ये रक्तामधील लाल रक्तपेशी कमी होतात, अ‍ॅनिमियामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. लवकर लक्षात आल्यास लक्षणे ओळखून पौष्टिक कमतरता किंवा गंभीर आजार यासारख्या मूळ कारणांवर उपाय करणे शक्य होते.

पॉलीसिथेमियाः याउलट, हेमेटोक्रिटची पातळी जास्त असल्यास पॉलीसिथेमिया असण्याची शक्यता असते, असा विकार ज्यामध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गंभीर धोका टाळण्यासाठी पॉलिसिथेमियाचे निदान लवकर होणे महत्वाचे आहे.

हेदेखील वाचा – अशी लक्षणे दिसत असतील तर समजा किडनी झालीये कमकुवत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

जुनाट आजारांवर देखरेख

किडनीचे आजार, हृदयरोग किंवा फुफ्फुसांचे रोग असलेल्या रूग्णांना बऱ्याचदा नियमित हेमॅटोक्रिट चाचण्या करणे आवश्यक असते. या आजारामुळे आरबीसीचे उत्पादन आणि ऑक्सिजनच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून हेमॅटोक्रिट पातळी रोगाचे प्रमाण आणि उपचारांच्या कार्यक्षमतेचे प्रमुख सूचक बनते.

हायड्रेशन पातळीचे मूल्यांकन

हेमेटोक्रिटची पातळी हायड्रेशनच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यास मदत करू शकते. हेमॅटोक्रिट कमी म्हणजे ओव्हरहायड्रेशन तर उच्च पातळी म्हणजे डिहायड्रेशन असू शकते. हायड्रेशनचे प्रमाण योग्य असल्यास शरीर व्यवस्थित काम करू शकते, हायड्रेशनच्या असंतुलनाचा एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

बोन मॅरो फंक्शनचे मूल्यांकन

आरबीसीच्या निर्मितीसाठी बोन मॅरो जबाबदार असल्याने, हेमॅटोक्रिट चाचणी त्याच्या कार्याचे मूल्यांकन करण्यास मदत करू शकते. असामान्य हेमॅटोक्रिट पातळी अस्थिमज्जा विकार किंवा आरबीसी उत्पादनावर परिणाम करणार्या इतर समस्यांचे संकेत देऊ शकते.

हेमॅटोक्रिट चाचणी कधी करावी?

हेमेटोक्रिट चाचणी का करावी

नियमित तपासणीमध्ये बऱ्याचदा सीबीसीचा समावेश असतो, ज्यामध्ये हेमॅटोक्रिट चाचणीचा समावेश असतो. यामुळे लक्षणे नसतानाही आरोग्याच्या संभाव्य समस्या लवकर लक्षात येण्यास मदत मिळते.

हेदेखील वाचा – दुपारी झोप टाळण्यासाठी पिताय चहा? शरीराला कसे ठरते नुकसानदायी

अ‍ॅनिमिया किंवा पॉलिसिथेमियाची लक्षणे

  • तुम्हाला सतत थकवा
  • चक्कर येणे
  • श्वासोच्छवासाचा त्रास
  • अशक्तपणा किंवा त्वचा लालसर होणे 
अशी लक्षणे आढळल्यास, मूळ कारण शोधण्यासाठी तुमचे डॉक्टर हेमॅटोक्रिट चाचणी करून घ्यायला सांगू शकतात.

गंभीर आजारांचे व्यवस्थापन

मूत्रपिंड रोग, हृदय बंद पडणे किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारखे गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार उपचारात बदल करण्यासाठी हेमॅटोक्रिट चाचण्या नियमितपणे केल्या पाहिजेत.

प्री – आणि पोस्ट – सर्जिकल मूल्यांकन

अ‍ॅनिमिया किंवा रक्त मोठ्या प्रमाणात कमी होणे होण्याचा धोका नाही याची खात्री करण्यासाठी बऱ्याचदा शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर हेमॅटोक्रिट चाचण्या केल्या जातात.

हायड्रेशन आणि एकूण आरोग्यावर लक्ष ठेवणे 

अ‍ॅथलीट्स, उंच भागात राहणारे लोक आणि आहार किंवा हायड्रेशनच्या स्थितीत लक्षणीय बदल झालेल्यांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि हायड्रेशन आणि आरबीसी पातळीशी संबंधित अडचणी टाळण्यासाठी नियमितपणे केलेल्या हेमॅटोक्रिट चाचण्यांचा फायदा होऊ शकतो.

हेमॅटोक्रिट चाचणी हे एक साधे परंतु प्रभावी साधन आहे जे आपल्या आरोग्याबद्दल आवश्यक माहिती देते. नियमित चाचणीमुळे वेळेवर निदान होऊन काही आजार असल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात पर्यायाने आरोग्य चांगले राहण्यात मदत मिळते. तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार हेमॅटोक्रिट चाचण्यांची योग्य वारंवारता आणि वेळ निश्चित करण्यासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What is hematocrit test when should be done from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 05:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.