चहा पिण्याचे नुकसान
चहाशिवाय राहणं अनेकांना कठीण ठरतं, कारण ते त्यांचे आवडते पेय आहे. भारतात पाण्यानंतर जर सर्वाधिक कोणते पेय पिण्यात येत असेल तर ते म्हणजे चहा. चहा केव्हाही पिऊ शकत असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नाही असे अनेकदा अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
दुपारी अनेकदा ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप येते. तर घरीदेखील जेवल्यानंतर आळस येतो आणि काम आहे म्हणून चहा प्यायला जातो. मात्र, पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, जर तुम्ही दुपारी चहा प्यायला तर तुमच्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
झोपेवर नकारात्मक परिणाम

चहा पिण्याने झोपेवर परिणाम
दुपारी चहा प्यायल्याने झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. चहामध्ये असलेले कॅफिन हे एक नैसर्गिक उत्तेजक आहे जे मेंदूला जागृत ठेवते. दुपारी चहा प्यायल्याने झोप उडते हे खरं असलं तरीही दिवसभर विश्रांती घेणे कठीण होऊ शकते आणि याशिवाय दिवसभराची झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
हेदेखील वाचा – जेवणानंतर लगेच झोप येते? अतिशय घातक ठरू शकते ही सवय, वाचा काय आहे कारण
पचनक्रियेमध्ये बाधा

पचनक्रियेला येते बाधा
चहामध्ये टॅनिन असतात, जे पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. दुपारी चहा प्यायल्याने ॲसिडीटी, गॅस आणि पोटात जळजळ यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास या समस्या आणखी वाढू शकतात. हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते.
लोह शोषण्यास त्रास

शरीरात पुरेसे लोह मिळत नाही
चहामध्ये टॅनिन आणि इतर संयुगे असतात जे आपल्या शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकतात. दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने अन्नातील लोह योग्य प्रकारे शोषले जाण्यास प्रतिबंध होतो. यामुळे लोहाची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मूड स्विंग्ज

चहा सतत पिण्याने मूड स्विंग्ज होतात
कॅफिनच्या अतिसेवनामुळे आपल्या मूडवरही परिणाम होतो. दुपारी चहा प्यायल्याने मूड स्विंग, चिडचिड आणि निद्रानाश होऊ शकतो. कॅफीनमुळे निर्माण होणाऱ्या झटपट ऊर्जेनंतर येणारा थकवा आणि आळसही आपल्या मूडवर परिणाम करू शकतो. त्यामुळे सतत चिडचिड होऊन नात्यावरही परिणाम होतो.
डिहायड्रेशनचा धोका

डिहायड्रेशनचा होतो त्रास
चहामध्ये कॅफिन असते जे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. याचा अर्थ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन वारंवार लघवीला जावे लागते. दुपारी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो, विशेषतः तुम्ही पुरेसे पाणी न पिण्याने अधिक त्रास होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






