किडनी कमकुवत झाल्याची लक्षणे कशी ओळखावी
पोटाच्या वरच्या भागाच्या दोन्ही बाजूला बीन्सच्या आकाराचे दोन मूत्रपिंड असतात. याला किडनी म्हणतात. शरीराताली हा भाग अत्यंत मोल्यवान मानला जातो. लहान मूत्रपिंड प्रत्येक क्षणी आपल्या शरीरात प्रवेश करणारे विष किंवा विषारी पदार्थ फिल्टर करते आणि शरीरातून बाहेर टाकते. आपल्या शरीरात उपस्थित असलेले सर्व रक्त दिवसातून किमान 40 वेळा किडनी फिल्टरेशनद्वारे जाते आणि प्रत्येक वेळी किडनी त्यातील हानिकारक पदार्थ गाळून लघवीद्वारे काढून टाकते.
जरा विचार करा, किडनी नसती तर आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या विषारी द्रव्यांचे काय झाले असते. जर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागले तर माणूस किती दिवस जगेल? त्यामुळे किडनी मजबूत असणे खूप गरजेचे आहे. किडनी मजबूत असेल तर अनेक आजारांचा धोका आपोआप नाहीसा होतो. म्हणूनच, आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमची किडनी किती मजबूत आहे. (फोटो सौजन्य – iStock)
लघवीशी संबंधित समस्या
लघवीला होणारा त्रास
Mayo Clinic च्या मते, लघवीशी संबंधित समस्या हे किडनी कमकुवत होण्याचे पहिले लक्षण आहे. खरे तर लघवीला त्रास होत असेल, लघवीचा रंग, त्याचे प्रमाण, त्याची रचना इत्यादींमध्ये बदल होत असेल तर समजून घ्या की किडनी कमकुवत होऊ लागली आहे.
लघवीतून प्रथिने बाहेर पडू लागल्यास, लघवी करताना फेस तयार होतो. त्याच वेळी, लघवीचा वासदेखील एक वाईट संकेत मानला जातो. ही सर्व लक्षणे किडनीशी संबंधित अनेक आजारांची लक्षणे आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की किडनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कमकुवत होत आहे.
हेदेखील वाचा – मान्सून आणि किडनी आजारांमध्ये नेमका संबंध काय?
पायांना सतत सूज येणे
पायांना सारखी सूज येणे
जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये पाणी शिरू लागते, ज्यामुळे पाय सूजू लागतात. जेव्हा किडनी कमकुवत असते तेव्हा योग्यरित्या फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे संतुलन बिघडते आणि पायांना सूज येऊ लागते. पायाशिवाय चेहऱ्यावर आणि डोळ्यांखालीदेखील सूज येऊ लागते
छातीत दुखणे
छातीत कळा येणे वा दुखणे
किडनीच्या समस्येमुळे पोटाच्या वरच्या भागात दुखणे स्वाभाविक आहे, मात्र छातीत दुखत असेल तर तो फक्त हृदयाचाच नाही तर मूत्रपिंडाचा त्रास होतो. रक्त योग्य प्रकारे फिल्टर करू शकत नसल्यामुळे हृदयाच्या अस्तरांजवळ जमा होऊ लागते, ज्यामुळे छातीत दुखू शकते. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला नक्कीच महागात पडू शकते.
उच्च रक्तदाबाचा त्रास
रक्तदाबाचा त्रास होणे
हाय बीपी अर्थात उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या पण जेव्हा उच्च रक्तदाब असतो तेव्हा त्याचा परिणाम किडनीवरही होतो. त्यामुळे किडनी कमकुवत होऊ लागते. उच्च रक्तदाबामुळे हळूहळू किडनीवर अतिरिक्त दबाव वाढतो आणि त्यामुळे किडनीशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.
सतत श्वास लागणे
काहीही काम न करताही श्वास लागणे
जेव्हा श्वास घेण्यात अडचण येते आणि नेहमी श्वास घेण्यास त्रास होतो, तेव्हा मूत्रपिंड संबंधित समस्यांमुळेदेखील हा त्रास असू शकतो. खरं तर, जेव्हा रक्ताचे संतुलन बिघडते तेव्हा फुफ्फुसांमध्ये कचरा जमा होऊ लागतो, ज्यामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो.
हेदेखील वाचा – उष्णतेच्या परिणामाने सडू शकते किडनी, या लक्षणांपूर्वी करा 4 उपाय
भूक न लागणे
अन्नावरची वासना उडणे
किडनी कमकुवत झाल्यामुळे भूक खूप कमी लागते. अनेक आजारांमध्ये भूक न लागणे हा संकेत असला तरी लघवीला त्रास होण्याबरोबरच भूक कमी होत असेल तर किडनी कमकुवत झाली आहे असे समजावे.
मूत्रपिंड शरीरातील घाण काढून टाकत नसेल तर ही घाण शरीराच्या अंतर्गत भागात जमा होऊ लागते. यामुळे उलट्या, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे भूक कमी होऊन वजन कमी होण्यास सुरुवात होते. पोटदुखीचा त्रासही होतो.
टीपः हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
संदर्भ
https://my.clevelandclinic.org/health/diseases/17689-kidney-failure
https://www.kidney.org/news/ekidney/august14/10_Signs_You_May_Have_Kidney_Disease
https://www.webmd.com/a-to-z-guides/understanding-kidney-disease-basic-information