(फोटो सौजन्य: Pinterest)
तुम्हालाही Breast cancer तर नाही? कपडे घालताना ही गोष्ट नक्की तपासा, वेळीच टाळता येईल गंभीर समस्या
आरोग्य आणि फिटनेसबाबत निर्णय
फिटनेसच्या बाबतीत आपण उद्यावर ढकलत राहतो किंवा एखाद्या मित्रांसोबत सुरू करू असा विचार करतो. पण असं करताना वेळ निघून जातो आणि आरोग्य मागे राहतं. म्हणून स्वतःला नेहमी पाहिलं प्राधान्य ह्या किमान रोज काही वेळ व्यायामासाठी राखून ठेवा.
मानसिक शांतात धोक्यात येत असेल
जीवनात लोक काही असे असतात जे सतत नकारात्मक पसरवत राहतात. अशा व्यक्तींना दूर ठेवणे ही स्वार्थाची गोष्ट नसून तुमच्या मानसिक आरोग्यसाठी केलेलं योग्य पाऊल आहे. स्वतःला शांत करण्यासाठी ध्यान किंवा स्वतःसोबतचा वेळ महत्वाचा ठरतो.
तुम्ही पूर्णपणे थकलेले असाल
दैनंदिन कामात माणूस शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे थकतो. पण लोक काय म्हणतील या भीतीने आपण आराम टाळतो. लक्षात ठेवा, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा ताण घेतल्याने बर्नआउट होतं आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. त्यामुळे थकलात तर आराम करा.
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या
भावनांचा आदर करत नाही
अशा नातेसंबंधाचा तुमच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो. जर कोणी सतत तुमची उपेक्षा करत असेल किंवा फक्त गरज असताना तुमच्याशी संपर्क करत असेल, तर त्या नात्यापासून दूर होणं हेच योग्य. हे तुमच्या भावनिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.
स्वतःच्या मतांना प्राधान्य द्या
जीवनातील मोठे निर्णय घ्यायचे असतील तेव्हा करिअर, नाती, भविष्य प्रत्येक मोठा निर्णय घेताना इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या प्राधान्यांवर विश्वास ठेवा. इतरांना खुश करण्यासाठी घेतलेले निर्णय पुढे जाऊन तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






