पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
सर्वच महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसांमध्ये अनेक समस्या उद्भवतात. ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे, उलटी सारखं होणे, मळमळ, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या दिवसांमध्ये कामात व्यवस्थित लक्ष सुद्धा लागत नाही. प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या चक्रात बदल होत असतो. काहींना मासिक वेळी योग्य वेळेत येते तर काहींना मासिक पाळी येण्याच्या आधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर क्रॅम्प्स, मूड बदलणं, थकवा, चिडचिड, राग, ताप इत्यादी सामान्य समस्या जाणवतात. काही महिला प्रचंड शारीरिक त्रास होतो तर काहींना मासिक पाळीमध्ये कोणतीही समस्या उद्भवत नाही.
मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. पण याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची आणि स्वच्छतेची योग्य ती काळजी घ्यावी. मासिक पाळी येण्याआधी शरीरात हर्मिनल बदल होत असतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना अनेक महिलांना सामान्य वाटतात. पण या समस्यांना पीरियड फ्लू असे म्हणतात. बहुतांश महिलांना पीरियड फ्लूचा अर्थ काय? पीरियड फ्लूमध्ये कोणती लक्षणे जाणवतात? याबद्दल काहीच माहिती नसेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा:किडनी 36 आणि फुफ्फुस 8 तास, जाणून घ्या मृत्यूनंतर कोणता अवयव किती काळ काम करतो

पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी यांनी सांगितल्यानुसार, मासिक पाळी हे एक हार्मोनल चक्र आहे, ज्यामध्ये मुख्य हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा समावेश असतो. महिलांमध्ये उद्भवणारा पीरियड फ्लू म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी, पोट फुगणे आणि मूड बदलणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. ही सर्व लक्षणे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोमशी संबंधित असल्यामुळे बऱ्याच महिलांना पीरियड फ्लू हा शब्द माहित नाही. तसेच पीरियड फ्लूचा इन्फ्लूएंझा किंवा सामान्य फ्लूशी कोणताही संबंध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच घरगुती औषधांचे सुद्धा सेवन करू शकता. घरगुती उपाय केल्यामुळे आराम मिळतो. मासिक पाळीत असह्य वेदना होत असतील तर तुम्ही काळीमिरी बारीक करून त्यात गूळ मिक्स करून चाटण बनवून खाऊ शकता. यामुळे पोट दुखी थांबेल आणि आराम मिळेल. तसेच या दिवसांमध्ये आहारात थंड दह्याचे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. मासिक पाळी आल्यानंतर नियमित हलका व्यायाम करावा आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे.






