Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिरीयड फ्लू म्हणजे काय? पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पोटात दुखणे, क्रम्प्स येणे, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्यांकडे महिला दुर्लक्ष करतात. या समस्यांना पिरीयड फ्लू असे म्हणतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2024 | 03:31 PM
पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसांमध्ये अनेक समस्या उद्भवतात. ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे, उलटी सारखं होणे, मळमळ, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या दिवसांमध्ये कामात व्यवस्थित लक्ष सुद्धा लागत नाही. प्रत्येक महिन्याला मासिक पाळीच्या चक्रात बदल होत असतो. काहींना मासिक वेळी योग्य वेळेत येते तर काहींना मासिक पाळी येण्याच्या आधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर क्रॅम्प्स, मूड बदलणं, थकवा, चिडचिड, राग, ताप इत्यादी सामान्य समस्या जाणवतात. काही महिला प्रचंड शारीरिक त्रास होतो तर काहींना मासिक पाळीमध्ये कोणतीही समस्या उद्भवत नाही.

मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. पण याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची आणि स्वच्छतेची योग्य ती काळजी घ्यावी. मासिक पाळी येण्याआधी शरीरात हर्मिनल बदल होत असतात. या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना अनेक महिलांना सामान्य वाटतात. पण या समस्यांना पीरियड फ्लू असे म्हणतात. बहुतांश महिलांना पीरियड फ्लूचा अर्थ काय? पीरियड फ्लूमध्ये कोणती लक्षणे जाणवतात? याबद्दल काहीच माहिती नसेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा:किडनी 36 आणि फुफ्फुस 8 तास, जाणून घ्या मृत्यूनंतर कोणता अवयव किती काळ काम करतो

पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

पीरियड फ्लू म्हणजे काय?

स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी यांनी सांगितल्यानुसार, मासिक पाळी हे एक हार्मोनल चक्र आहे, ज्यामध्ये मुख्य हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा समावेश असतो. महिलांमध्ये उद्भवणारा पीरियड फ्लू म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी, पोट फुगणे आणि मूड बदलणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. ही सर्व लक्षणे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोमशी संबंधित असल्यामुळे बऱ्याच महिलांना पीरियड फ्लू हा शब्द माहित नाही. तसेच पीरियड फ्लूचा इन्फ्लूएंझा किंवा सामान्य फ्लूशी कोणताही संबंध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पीरियड फ्लूची लक्षणे:

  • कंबर दुखणे
  • ओटी पोटात दुखणे
  • चक्कर येणे
  • मळमळ
  • थकवा
  • डोकेदुखी
  • क्रॅम्प्स
  • पायांना सूज येणे
  • डोकं दुखणे
  • स्तनांमध्ये वेदना होणे, इत्यादी समस्या जाणवू लागतात.
हे देखील वाचा:आयुर्वेदातील सर्वाधिक शक्तीशाली वनस्पती, ताप-सर्दी-खोकल्यापासून अनेक आजारांवर गुणकारी

पिरीयड फ्लूमध्ये महिलांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

पीरियड फ्लूवर घरगुती उपाय:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच घरगुती औषधांचे सुद्धा सेवन करू शकता. घरगुती उपाय केल्यामुळे आराम मिळतो. मासिक पाळीत असह्य वेदना होत असतील तर तुम्ही काळीमिरी बारीक करून त्यात गूळ मिक्स करून चाटण बनवून खाऊ शकता. यामुळे पोट दुखी थांबेल आणि आराम मिळेल. तसेच या दिवसांमध्ये आहारात थंड दह्याचे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. मासिक पाळी आल्यानंतर नियमित हलका व्यायाम करावा आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is period flu home remedies for period flu symptoms of period flu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 03:31 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन
1

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल नारळ पाणी! फायद्यांऐवजी होतील तोटे, अजिबात करू नका सेवन

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ
2

बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा ‘ही’ फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना कोणत्याही क्षणी येऊ शकतो ब्रेन स्टोक! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत
4

जेवताना कधी आणि किती प्रमाणात पाण्याचे सेवन करावे? जाणून घ्या किती पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया राहील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.