Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ल्युपसमुळे होणाऱ्या आर्थरायटिस आणि रूमेटॉईड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय आहे फरक

गंभीर परिस्थितीत ल्युपसचा परिणाम मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवरही होऊ शकतो. विशेषतः ल्युपस नेफ्रायटिस म्हणजेच मूत्रपिंडांवर परिणाम झाल्यास उच्च रक्तदाब आणि घोट्यांभोवती सूज अशी लक्षणे दिसू शकतात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 09, 2026 | 09:00 AM
ल्युपसमुळे होणाऱ्या आर्थरायटिस आणि रूमेटॉईड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय आहे फरक

ल्युपसमुळे होणाऱ्या आर्थरायटिस आणि रूमेटॉईड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय आहे फरक

Follow Us
Close
Follow Us:

सांधेदुखी हे अनेक वैद्यकीय समस्यांमधील एक सामान्य लक्षण आहे, विशेषतः ऑटोइम्यून आणि वयोमानानुसार होणाऱ्या आजारांमध्ये. मात्र, प्रत्येक प्रकारचा आर्थरायटिस वेगळा असतो. ल्युपसमुळे होणारा आर्थरायटिस हा रूमेटॉईड आर्थरायटिस (RA) आणि  ऑस्टिओआर्थरायटिस (OA) यांच्यापेक्षा वेगळा असतो. आजाराची लक्षणे, स्वरूप आणि शरीरावर होणारा परिणाम या सर्व बाबींमध्ये फरक दिसून येतो. डॉ. अनीसा कपाडिया, रुमॅटोलॉजिस्ट, Saifee Hospital, यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – istock)

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

ल्युपस आर्थरायटिस हा Systemic Lupus Erythematosus (SLE) या ऑटोइम्यून आजाराचा एक भाग आहे. या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील विविध अवयव आणि ऊतींवरच हल्ला करते. ल्युपस असलेल्या रुग्णांमध्ये बोटे, मनगट, खांदे आणि गुडघे यांमध्ये वेदना आणि सूज दिसून येते. ही लक्षणे वेळोवेळी बदलू शकतात आणि एका सांध्यातून दुसऱ्या सांध्यात जाणवू शकतात.

ल्युपस आर्थरायटिस आणि RA किंवा OA मधील सर्वात मोठा फरक म्हणजे ल्युपस आर्थरायटिसमुळे सांधे कायमस्वरूपी विकृत होत नाहीत. रुग्णांना वेदना, कडकपणा आणि सूज जाणवू शकते, पण रूमेटॉईड आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिसप्रमाणे सांध्यांचे कायम नुकसान सहसा होत नाही. रूमेटॉईड आर्थरायटिस हा देखील ऑटोइम्यून आजार आहे, परंतु तो मुख्यतः सांध्यांवर परिणाम करतो. वेळेवर उपचार न घेतल्यास कूर्चा (cartilage) आणि हाडांचे नुकसान होऊन सांधे विकृत होऊ शकतात. तर ऑस्टिओआर्थरायटिस हा मुख्यतः वयोमानानुसार सांध्यांमध्ये होणाऱ्या झिजेमुळे निर्माण होणारा आजार आहे.

ल्युपस आर्थरायटिसची इतर प्रकारच्या आर्थरायटिसपासून वेगळी ओळख म्हणजे त्याची लक्षणे केवळ सांध्यांपुरती मर्यादित नसतात. ल्युपस रुग्णांमध्ये त्वचेवर पुरळ, विशेषतः नाक आणि गालांवर फुलपाखराच्या आकाराचा पुरळ, तोंडातील अल्सर, केस गळणे, ताप, थकवा आणि लिम्फ नोड्समध्ये सूज अशी लक्षणेही दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये Raynaud’s Syndrome मुळे हातापायांच्या बोटांचा निळसर रंगही दिसू शकतो.

गंभीर परिस्थितीत ल्युपसचा परिणाम मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवरही होऊ शकतो. विशेषतः ल्युपस नेफ्रायटिस म्हणजेच मूत्रपिंडांवर परिणाम झाल्यास उच्च रक्तदाब आणि घोट्यांभोवती सूज अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ल्युपसचा धोका तरुण महिलांमध्ये अधिक आढळतो, मात्र पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे इतर संसर्गजन्य किंवा दाहजन्य आजारांसारखी वाटू शकतात, त्यामुळे निदान करणे कठीण होऊ शकते.

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

ल्युपसमुळे होणाऱ्या आर्थरायटिस आणि इतर प्रकारच्या आर्थरायटिसमधील फरक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वेळेवर निदान आणि उपचार केल्यास लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात आणि शरीराच्या अवयवांचे दीर्घकालीन नुकसान टाळता येऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ल्युपसमुळे होणारा आर्थरायटिस म्हणजे काय?

    Ans: ल्युपस हा ऑटोइम्यून आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या सांध्यांवर आणि अवयवांवर हल्ला करते. त्यामुळे सांधेदुखी, सूज आणि कडकपणा जाणवू शकतो.

  • Que: ल्युपस आर्थरायटिस आणि रूमेटॉईड आर्थरायटिसमध्ये मुख्य फरक काय आहे?

    Ans: रूमेटॉईड आर्थरायटिसमध्ये सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते, तर ल्युपसमधील आर्थरायटिसमध्ये सूज आणि वेदना असल्या तरी सांध्यांचे नुकसान तुलनेने कमी होते.

  • Que: ल्युपस आर्थरायटिसची सामान्य लक्षणे कोणती?

    Ans: सांधेदुखी, सकाळी कडकपणा, हात-पायांच्या सांध्यांमध्ये सूज, थकवा आणि शरीरदुखी ही सामान्य लक्षणे असू शकतात.

Web Title: What is the difference between arthritis caused by lupus and rheumatoid arthritis or osteoarthritis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Doctor advice
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

वारंवार गॅस होऊन पोट फुगल्यासारखे वाटते? जीवनशैलीत होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे वाढतो अपचनाचा त्रास, आहारात करा बदल
1

वारंवार गॅस होऊन पोट फुगल्यासारखे वाटते? जीवनशैलीत होणाऱ्या ‘या’ चुकांमुळे वाढतो अपचनाचा त्रास, आहारात करा बदल

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
2

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा आजार काय असतो? उपचार कसे केले जातात? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत
3

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे
4

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.