Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?

Stress Spikes Blood Sugar Spike: मधुमेहाचा संबंध फक्त आहाराशी नसून मानसिक आरोग्याशीही आहे. सततचा तणाव हार्मोन्सचे संतुलन बिघडवून रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तणाव व्यवस्थापनही महत्त्वाचे ठरते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 22, 2026 | 08:09 PM
Stress and Diabetes Connection: तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका; शरीरावर कसा होतो परिणाम?
Follow Us
Follow Us:
  • तणावामुळे वाढू शकतो डायबिटीजचा धोका
  • शरीरावर कसा होतो परिणाम?
  • तणावामुळे ब्लड शुगर का वाढते?
मधुमेह हा केवळ आहार आणि जीवनशैलीशी संबंधित आजार मानला जातो, पण मानसिक आरोग्याचाही याचा संबंध आहे. अनेकदा लोक तणावाला सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात, मात्र सततचा मानसिक ताण शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवून रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे अधिक कठीण जाते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी योग्य आहार आणि औषधांसोबतच तणावावर नियंत्रण ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. तणाव आणि मधुमेह यांच्यातील हा संबंध नेमका कसा काम करतो आणि त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात.

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान; आहारात करा समावेश

तणावामुळे ब्लड शुगर का वाढते?

जेव्हा शरीर तणावाचा सामना करत असते, तेव्हा अॅड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल यांसारखे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्रवतात. हे हार्मोन्स शरीराला तातडीच्या परिस्थितीसाठी तयार करतात आणि ऊर्जा मिळावी म्हणून यकृतातून अधिक ग्लुकोज रक्तात सोडले जाते. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये ही अतिरिक्त साखर नियंत्रित करणे कठीण होऊ शकते.

इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते

सतत वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे शरीरात इन्सुलिन प्रतिकार (Insulin Resistance) निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेशींना ग्लुकोजचा योग्य वापर करता येत नाही.

जीवनशैलीच्या सवयी बिघडतात

तणावामुळे अनेकजण जास्त खाणे, गोड पदार्थांचे सेवन, व्यायाम टाळणे किंवा अपुरी झोप घेणे यांसारख्या सवयी अंगीकारतात. याचा थेट परिणाम रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर होतो.

मधुमेहाचे व्यवस्थापन कठीण होते

अतिताणामुळे औषधे वेळेवर घेणे, ब्लड शुगर तपासणे किंवा योग्य आहार पाळणे याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे साखरेची पातळी अस्थिर राहू शकते.

तणाव कमी करण्यासाठी काय करावे?

नियमित व्यायाम, योग, ध्यान, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यांचा अवलंब केल्यास तणाव नियंत्रणात राहू शकतो. तसेच मित्र-परिवाराशी संवाद साधणे आणि आवडत्या छंदांसाठी वेळ देणेही फायदेशीर ठरते. तणाव आणि मधुमेह यांचा जवळचा संबंध लक्षात घेता मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३ सें.मी. चुंबक गिळलेल्या ७ वर्षीय मुलीवर यशस्वी उपचार; एंडोस्कोपिक प्रक्रियेमुळे गंभीर गुंतागुंत टळली

Web Title: Stress diabetes blood sugar cortisol insulin resistance management tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • mental stress

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
2

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
3

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.