१६ ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्षाची सुरुवात होत आहे. जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा आरंभ असे दोन दिवस पारशी लोक साजरे करतात. पारशी वर्षाचा शेवटचा दिवस आणि नूतन वर्षाचा आधीचा दिवस ‘पतेती’ असतो. तर पारशी वर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ म्हणून ओळखला जातो.
पतेतीच्या दिवशी पारशी लोक गेल्या वर्षभरात झालेल्या चूकांची आणि गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चातापाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर पारशी समाजाचं नवं वर्षाचा पहिला दिवस नवरोझ असतो. नवरोझच्या दिवशी पारशी लोक त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन तेथे प्रार्थना करतात. तसेच एकमेकांना गळाभेटी देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतात. नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणींना भेटतात. या उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करण्याची देखील पारशी समाजात परंपरा आहे.
भारतात पारशी हा अत्यंत लहान समुदाय आहे. हा समुदाय शहेनशाही, फसली आणि कदिमी अशा तीन विभागात विभागला आहे. त्यामुळे भारतात पारशी नववर्ष हे ऑगस्ट महिन्यात साजरे केले जाते. फरवर्दीन महिन्याचा पहिला दिवस हा पारसी नवनवर्षाचा पहिला दिवस असतो आणि तो ‘नवरोज’ म्हणून साजरा केला जातो. ही सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे, असा नवरोझचा अर्थ होतो. ह्या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना केली जाते आणि खास पारशी भोजनाचा आस्वाद घेतला जातो.
पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करुन त्याला सिंहासनावर बसवले होते. जमशेद यांनीच सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती. तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पतेती दिवस साजरा करण्यास सुरवात केली. पारशी समाजातील लोक दरवर्षी पतेती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरोझच्या आधीचा दिवस हा पतेती असतो. या दिवशी वर्षभरात झालेल्या चूकांची, गुन्ह्यांची कबुली देऊन हा दिवस पश्चाताप करण्याचा करण्याचा असतो.