Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रोहा-तांबडी रस्त्याची दयनीय अवस्था! निवडणुकीच्या तोंडावरही प्रशासनचे दुर्लक्ष, प्रवासी-ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

रोहा तालुक्यातील दुर्गम भागात येणाऱ्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की दैनंदिन प्रवास नाहक त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो खड्डेमुक्त व सुरक्षित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 31, 2026 | 02:27 PM
Raigad News: रोहा-तांबडी रस्त्याची दयनीय अवस्था! निवडणुकीच्या तोंडावरही प्रशासनचे दुर्लक्ष, प्रवासी-ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

Raigad News: रोहा-तांबडी रस्त्याची दयनीय अवस्था! निवडणुकीच्या तोंडावरही प्रशासनचे दुर्लक्ष, प्रवासी-ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

Follow Us
Close
Follow Us:
  • चिखल-खड्ड्यांचा सापळा! रोहा-तांबडी रस्त्याने प्रवाशांची परीक्षा
  • रस्ता की रणांगण? रोहा-तांबडी मार्गाची भीषण दुरवस्था
  • मतं मागायला येणार, रस्ता करायला विसरले?
धाटाव: रोहा तालुक्यातील दुर्गम भागात येणाऱ्या तांबडी-बारशेत रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून हा संपूर्ण रस्ता खड्डे व दगडांनी भरलेल्या मार्गात रूपांतरित झाला आहे. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर डांबरीकरणाचा थर नामशेष झाल्याने वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

कोल्हापूरच्या शहापुरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; चहा करण्यासाठी गॅस पेटवला अन्…

या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, कष्टकरी शेतकरी, कामगार वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक लालपरीसह खासगी वाहनांतून नियमित प्रवास करतात. मात्र रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की दैनंदिन प्रवास नाहक त्रासदायक ठरत आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाही या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची साधी मलमपट्टीदेखील करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुनेश्वर जिल्हा परिषद व धाटाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील निवी ठाकरवाडी, वाशी ग्रामपंचायत हद्दीतील कारिवणे व धनगरवाडी, वाली ग्रामपंचायत हद्दीतील बारशेत, मुळगाव, चिचोटी, जाधववाडी, गौळवाडी, सवाने तसेच तांबडी ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी बुद्रुक, ताम्हणशेत, शेठ बुद्रुक व खुर्द अशा अनेक गावांचा या मार्गात समावेश होतो. या सर्व वाड्या-वस्त्यांमधून सुमारे अडीच ते तीन हजार मतदार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created) 

राजकीय नेत्यांची केवळ मतांची मागणी

निवडणुकीच्या काळात राजकीय नेते केवळ मतांची मागणी करण्यासाठी येतात, मात्र नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व रस्त्याची दयनीय अवस्था पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये आहे. त्यामुळे यावेळी रस्ता नसेल तर मत नाही’ अशी ठाम भूमिका मतदार राजा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होण्याची चर्चा परिसरात रंगली आहे. दरम्यान, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो खड्डेमुक्त व सुरक्षित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्ग व स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात येत आहे.

Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना

नागरिकांचा खड्ड्यांतून मोठ्या कसरतीचा प्रवास

या रस्त्यालगत तांबडी बुद्रुक, निवी ठाकरवाडी, सवाने, बारशेत गौळवाडी, म्हासाडी, वाली आणि कारिवणे ही गावे येतात. या गावांतील नागरिकांना रोहा बाजारपेठ, शासकीय कार्यालये, दवाखाने व इतर कामांसाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली आहे की नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्याचे टेंडर मंजूर झाले आहे. मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने काम सुरू करता येत नाही. आचारसंहितेला शिथिलता मिळताच तातडीने काम सुरू करण्यात येईल, सध्या चार किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे.- विजय बागुल, उपअभियंता, सा.बा.वि., रोहा

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The pathetic condition of the roha tambadi road neglect continues even ahead of elections commuters and villagers angry raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • raigad
  • Road Work

संबंधित बातम्या

Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना
1

Chandrapur News: रेशनचा तांदूळ बाजारात? ट्रकमध्ये साठा सापडल्याने जिल्ह्यात खळबळ, गोंडपिपरी परिसरातील घटना

Ratnagiri News: कोकणातील कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
2

Ratnagiri News: कोकणातील कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले
3

Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले

Raigad News: पेणमध्ये सत्तासमीकरण ढवळणार! भाजपाला कडवी झुंज, दोन्ही शिवसेना-शेकाप मैदानात
4

Raigad News: पेणमध्ये सत्तासमीकरण ढवळणार! भाजपाला कडवी झुंज, दोन्ही शिवसेना-शेकाप मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.