नसांमधील कमजोरी म्हणजे काय? शरीरातील नसा मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील उपाय
दीर्घकाळ निरोगी राहण्यसाठी शरीरातील प्रत्येक अवयव, बारीक नसा कायमच हेल्दी असणे महत्वाचे आहे. शरीराच्या आतील रचना अतिशय नाजूक आणि किचकट असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. धावपळीची जीवनशैली, मानसिक तणाव, आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मानवी शरीरात असलेली प्रत्येक नस निरोगी राहण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. एका व्यक्तीच्या शरीरात ७२ हजारांपेक्ष जास्त नसा असतात. या नसा संपूर्ण शरीरात पसरलेल्या असतात. यातील काही नसा शरीराला रक्तप्रवाह करतात तर काही नसा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात असलेल्या वेगवेगळ्या नसामुळे मेंदूला वेगवेगळे संकेत पाठवले जातात. पण बऱ्याचदा आरोग्यासंबंधित समस्यांमुळे शरीरातील नसांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. नसा कमजोर झाल्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेदना, सुन्नपणा, झिणझिण्या इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर या समस्या उद्भवू लागतात. नसा कमजोर होण्यामागील एकमेव कारण म्हणजे जीवनसत्वाची कमतरता. शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात.
शरीरामध्ये विटामिन आणि विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर नसांना इजा होण्याची जास्त शक्यता असते. ज्यावेळी शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण होते, त्यावेळी मेंदूपर्यंत योग्य संकेत पोहचले जात नाहीत. नसा कमजोर झाल्यानंतर अनेक वेगवेगळी लक्षणे शरीरात दिसून येतात. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता संपूर्ण शरीरासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. विटामिन शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवतात आणि नर्व्हस फंक्शन कायम निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. विटामिन डी आरोग्यासाठी आणि हाडांमधील लवचिकता वाढवण्यासाठी मदत करतात.
‘या’ वेळेत पित असाल कॉफी तर व्हा सावध! मेंदूत तयार होतेय विष; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा
नसा मजबूत ठेवण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यासाठी आहारात विटामिन बी १२, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि विटामिन डी ने समृद्ध असलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. आहारामध्ये कडधान्य, प्लांट बेस्ड मिल्क, अळशीच्या बिया, चिया सीड्स, अक्रोड, सोयाबीन इत्यादी पदार्थ नियमित खावे. याशिवाय हाडे मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम किंवा योगासने करणे आवश्यक आहे.
मज्जातंतू म्हणजे काय?
मज्जातंतू हे तुमच्या शरीरातील संदेशवहनाचे कार्य करणारे तंतू आहेत. ते मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये माहिती (संदेश) पोहोचवतात आणि मेंदूला प्रतिसाद देण्यासाठी परत पाठवतात. मज्जातंतू परिधीय मज्जासंस्थेचा (peripheral nervous system) भाग आहेत.
मज्जातंतूंची कार्ये काय आहेत?
तुमच्या मज्जासंस्थेचे मुख्य कार्य म्हणजे तुमच्या शरीराच्या विविध भागातून मेंदूला संदेश पाठवणे आणि मेंदूकडून तुमच्या शरीराला काय करायचे आहे हे सांगण्यासाठी परत संदेश पाठवणे. हे संदेश तुमच्या विचार, स्मृती, शिकणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवतात.
चेतासंस्थेचे आजार कोणते?
मेंदुज्वर (meningitis), पक्षाघात (stroke), मेंदूला मार लागणे किंवा मेंदूत गाठ (brain tumor) यांसारख्या समस्यांमुळे मज्जासंस्थेचे आजार होऊ शकतात.