लघवीला सतत वास येतो? शरीरसंबंधित उद्भवू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
दैनंदिन जीवनात होणाऱ्या लहान मोठ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी लघवीला गेल्यावर हलकासा वास येऊ लागतो. लघवीमध्ये युरिया, क्रिएटिनिन आणि शरीरातील विविध घटक असतात. पणहा वास काहीवेळा अतिशय घाणेरडा, कुजल्यासारखा किंवा अतिशय विचित्र असतो. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर लाघवीवर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर लघवीमध्ये जळजळ वाढणे, लघवी करताना वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
लघवी येणारा तीव्र वास पाण्याच्या कमतरतेमुळे नसून इतरही आरोग्यासंबंधित समस्यांमुळे असू शकतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला लघवीला वास येणायामागे कोणती कारणे असू शकतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीराला गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यानंतर लघवीमध्ये अनेक बदल दिसून येतात. लघवी करताना होणाऱ्या वेदना, जळजळ, वारंवार लघवीला होणे, ओटीपोटात वेदना होणे इत्यादी अनेक मुत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणे दिसून येतात. हा संसर्ग होण्यामागे अनेक कारणे आहेत. बॅक्टेरिया आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यामुळे संसर्ग पूर्णपणे लघवी मार्गामध्ये पसरतो. मूत्रमागाचा संसर्ग प्रामुख्याने महिलांमध्ये दिसून येतो तर काहीवेळा पुरुषांना होण्याची शक्यता असते.
नियमित पेनकिलर किंवा कॉम्प्लेक्ससारख्या गोळ्यांचे वारंवार सेवन केल्यामुळे लघवीच्या वासात अनेक बदल दिसून येतात. औषधांमध्ये असलेले हानिकारक घटक लघवीमधून बाहेर पडून जातात, ज्यामुळे लघवीला अतिशय घाणेरडा वास येऊ लागतो. पण गोळ्या औषधांचा कोर्स पूर्णपणे झाल्यानंतर सुद्धा हा वास कायम टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
IBS आणि कोलन कॅन्सरमध्ये काय आहे फरक? लक्षणं एकसारखीच; उडू शकतो गोंधळ
रक्तात वाढलेली साखर आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरातील इतर अवयवांमध्ये सुद्धा गंभीर परिणाम दिसून येतात. रक्तात वाढलेल्या साखरेच्या पातळीमुळे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज लघवीद्वारे बाहेर पडून जाते, ज्यामुळे लघवीला घाणेरडा वास येतो आणि वारंवार लघवीला जावे लागते. टाइप 1 डायबिटीज झाल्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते.
लघवीला वास येण्याची कारणे?
जेव्हा तुम्ही पुरेसे पाणी पीत नाही, तेव्हा तुमची लघवी जास्त केंद्रित होते आणि तिला तीव्र वास येऊ शकतो.काही पदार्थ, जसे की शतावरी, लसून, मसालेदार अन्न, कॉफी आणि काही औषधे, लघवीच्या वासावर परिणाम करू शकतात.
लघवीचा वास कमी करण्यासाठी उपाय:
दिवसातून 6-7 ग्लास पाणी प्या.संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.वैयक्तिक स्वच्छता राखा.आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य उपचार घ्या.
UTI ची कारणे काय आहेत?
UTI चा मुख्यत्वे बॅक्टेरियामुळे होतो, पण बुरशी आणि विषाणूमुळे देखील होऊ शकतो. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा UTI होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांची मूत्रमार्ग लहान असते आणि ती योनीच्या जवळ असते, ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे प्रवेश करू शकतात.