Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुंदर दिसण्यासाठी व्हायरल घरगुती उपाय करत असाल तर थांबा! उद्भवू शकतात त्वचेसंबंधित ‘या’ गंभीर समस्या

सोशल मीडियावर व्हायरल होणारे स्किन केअर उपाय करण्याऐवजी त्वचेला सूट होतील अशेच प्रॉडक्ट किंवा घरगुती उपाय करून पाहावे, अन्यथा त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2025 | 12:06 PM
व्हायरल घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणते नुकसान होते:

व्हायरल घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणते नुकसान होते:

Follow Us
Follow Us:

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. बदलत्या ऋतूनुसार त्वचेसंबंधित समस्या देखील बदलत जातात. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. पण हेच केमिकल युक्त महागडे प्रॉडक्ट त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात.(फोटो सौजन्य – iStock)

डार्क सर्कल- पिग्मेंटेशनची समस्या होईल कायमची दूर! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर काकडीपासून तयार केलेली हायड्रेटिंग क्रीम

हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम आणि फेसबुक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. इंस्टग्रामवर घरगुती उपाय, आयुर्वेदिक आणि बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर कसा करावा, याबद्दल माहिती किंवा व्हिडिओ शेअर केला जातो. हेच व्हिडिओ पाहून महिला किंवा मुली घरी फेशिअल करणे किंवा फेसपॅक करून लावला जातो. मात्र हे उपाय केल्यामुळे काहीवेळा त्वचेची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणते नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

व्हायरल घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेचे कोणते नुकसान होते:

चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी किंवा त्वचा चमकदार करण्यासाठी अनेक महिला लिंबाच्या रसाचा वापर करतात. मात्र त्वचेवर लिंबाचा रस डायरेक्ट लावू नये. यामुळे त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते. काहींची त्वचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक असते. अशा त्वचेवर लिंबाचा वापर केल्यास त्वचेचे नुकसान होते. त्वचेवर थेट लिंबाचा रस लावल्यामुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट किंवा त्वचा काळवंडून जाते.

चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर अनेक महिला पिंपल्सवर लसूण चोळतात. पण पिंपल्स आल्यानंतर त्यावर लसूण चोळणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे पिंपल्स जाण्याऐवजी पिंपल्स अधिक येऊ लागतात. यामुळे त्वचेची आग होते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारे घरगुती उपाय चुकूनही करू नका यामुळे त्वचा अधिक जास्त खराब होईल..

महागड्या क्रीम्सना करा बाय बाय, उन्हाळ्यात या 5 रुपयांच्या पदार्थाने सनबर्न ते ऑयली स्किनच्या समस्यांपासून मिळेल आराम

त्वचेवरील तेलकट आणि चिकटपणा कमी करण्यासाठी अनेक महिला नियमित चेहऱ्यावर बर्फ फिरवतात. पण त्वचेवर सारखाच बर्फ लावणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे चेहरा लाल होणे, रॅश किंवा त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर अनेक महिला थेट बर्फ लावतात. पण असे करण्याऐवजी रुमालात बर्फ ठेवून मगच चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण वाढेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Web Title: What skin damage does viral home remedies cause skin problems skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • side effect
  • Skin Care
  • skin problem

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य
1

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

High Blood Pressure: कमी मीठ खाता, तरीही BP वाढतोय? रोजच्या ‘या’  सवयीही ठरतात धोकादायक
2

High Blood Pressure: कमी मीठ खाता, तरीही BP वाढतोय? रोजच्या ‘या’ सवयीही ठरतात धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.