स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले? जाणून घ्या समर्थ कोणाचे अवतार होते
जगभरात स्वामींची मनापासून भक्ती करणारे अनेक भक्त आहेत. दरवर्षी मोठ्या आनंद आणि उत्साहात सगळीकडे स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. 1856-1876या कालावधीत महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. ते श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी बर्याच भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये जातात. तिथे स्वामी समर्थांचे मोठे मंदिर आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
स्वामी समर्थ महाराज कधी प्रकटले? त्यांचा जन्म कधी झाला? यावर कोणतीही ठोस माहिती नाही. पण अनेक कथांमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून 24 किमी अंतरावर असलेल्या छेली खेडा नावाच्या गावामध्ये एका वटवृक्षाखाली झाला होता. याशिवाय 1856 मध्ये अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात पहिल्यांदाच त्यांचे दर्शन झाले होते. त्यानुसार यंदाच्या वर्षी 31 मार्चला स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षी स्वामींचा 169 वा प्रकटदिन सोहळा साजरा केला जाणार आहे.
1856 मध्ये स्वामी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोटामध्ये आले होते. त्यांनी मंगळवेढमधून पहिल्यांदा अक्कलकोट नगरीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते खंडोबाच्या मंदिरात मुक्कामासाठी राहिले होते. त्यानंतर स्वामींनी चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८ ०६ एप्रिल 1856 हा काळ अक्कलकोटमध्ये काढला. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री स्वामी समर्थांनी भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे रूप घेतले असे मानले जाते.
भारतातील ‘या’ ५ मंदिरात विशेष नवरात्र पूजा, वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध; एकदा जरूर दर्शन करा
हिंदू पंचांगानुसार गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मन करून पूजा केली जाते. याशिवाय अनेक लोक यादिवशी उपवास करून स्वामी चरित्रांचे पठण केले जाते. गुरुवारच्या दिवशी अनेक लोक व्रत किंवा पूजा करतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ या स्वामींच्या शब्दांमधून जीवन जगण्याची एक वेगळीच ऊर्जा मिळते. स्वामींचे नामस्मन केल्यामुळे मनातील चिंता, भीती, द्वेष इत्यादी अनेक गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे दरवर्षी मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये स्वामी भक्त स्वामी समर्थांचा