Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांना ताकद मिळवून देणारे ‘शिलाजीत’ नक्की कुठे आणि कसे मिळते? काय आहे उपयोग जाणून घ्या

शिलाजितबद्दल अनेक गैरसमज आहेत, काही लोकांना वाटते की ती एक औषधी वनस्पती आहे, तर काही लोकांना त्याच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, नक्की वाचा हा लेख

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 27, 2025 | 05:10 PM
शिलाजीत कुठे आणि कसे मिळते

शिलाजीत कुठे आणि कसे मिळते

Follow Us
Follow Us:
  • शिलाजीत म्हणजे काय 
  • शिलाजीत नक्की कुठे आणि कसे उगवते
  • शिलाजीतबाबत गैरसमज 
शिलाजित हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात गैससमज निर्माण होता आणि अनेकांना वाटते की पुरुषांचा स्टॅमिना वाढविण्यासाठीच शिलाजीतचा वापर करण्यात येतो. अनेकांच्या मनात शक्तीची भावना निर्माण होते. तर शिलाजीतला उर्जेचा खजिना म्हणून देखील ओळखले जाते. 

पर्वतांमध्ये आढळणारे शिलाजित हे पुरुषांच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते, म्हणूनच त्याचा व्यवसाय सतत वाढत आहे. खरे शिलाजित हे मर्यादित प्रमाणात उपलब्ध असताना, बनावट शिलाजितदेखील मोठ्या प्रमाणात विकले जाते आणि अनेक लोकांनी ते उत्पन्नाचे स्रोत बनवले आहे. आज, आम्ही तुम्हाला शिलाजित कुठून येते आणि त्याची खरी ओळख काय आहे याबाबत माहिती देणार आहोत. 

शिलाजित म्हणजे काय?

शिलाजीतला ‘पर्वतांचा घाम’ असेही म्हणतात. हा एक चिकट पदार्थ आहे जो पर्वतांमध्ये झिरपतो, जो हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशात वनस्पती आणि सेंद्रिय पदार्थांच्या दीर्घकाळ विघटनानंतर तयार होतो. शिलाजीत हा गडद काळा रंगाचा पदार्थ असतो आणि फुलविक अ‍ॅसिड, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. म्हणूनच आयुर्वेदात कमकुवतपणावर मात करण्यासाठी हा एक शक्तिशाली उपाय मानला जातो. ते टेस्टोस्टेरॉनची पातळी वेगाने वाढवते.

वायग्रापेक्षाही डोंगरातून येणारा हा पदार्थ ठरतो ताकदवान, केवळ 3 थेंबाचे सेवन आणि पुरूषाचे वंध्यत्व होईल दूर

शिलाजित कुठे मिळते?

आता, लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुरूषांचा स्टॅमिना वाढविणारा हा खजिना कुठून येतो? भारतातील हिमालयीन प्रदेशात शिलाजित मुबलक प्रमाणात आढळते, जिथे लोक दरवर्षी पर्वतांमधून ते काढतात. ते कसे ओळखायचे हे सर्वांनाच माहीत नसते; ते खडकांमधून काढले जाते. शिलाजित नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिबेट आणि चीनच्या पर्वतीय प्रदेशातदेखील आढळते. आजही, अनेक ग्रामीण भागात ते रोजगाराचे एक प्रमुख साधन आहे.

शिलाजित कसे काढले जाते?

शिलाजित काढण्यासाठी, लोक उंच कड्यांवर चढून तेथे असलेले शिलाजितचे काळे दगड ओळखून आपला जीव धोक्यात घालतात. या दगडांमधील भेगांमध्ये शिलाजित आढळते. याचे तुकडे तोडले जातात, घरी आणले जातात आणि नंतर बराच काळ उकळले जातात. त्यानंतर, शिलाजित चाळून वेगळे केले जाते. नंतर ते पुन्हा उकळले जाते जोपर्यंत सुरुवातीला उकळताना वापरलेले पाणी बाष्पीभवन होत नाही तोपर्यंत त्यावर प्रक्रिया करण्यात येते. नंतर ते जाड काळा पदार्थ बनते, जे नंतर थंड करून पॅक करण्यात येते. खऱ्या शिलाजितची चव कडू असते, ते तुम्ही नुसते खाऊ शकत नाही. 

आयुर्वेदिक औषधी वनस्पती उत्तम आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त

शिलाजीत कसे खावे?

या विषयावर अधिक माहिती रामहंस चॅरिटेबल हॉस्पिटलमधील आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी दिली. डॉ. श्रेय यांच्या मते, शिलाजित हे पुरुषांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमची शारीरिक क्षमता कमी असेल तर तुम्ही शिलाजितचे सेवन करू शकता. पुरुषांसाठी शिलाजित घेण्याची योग्य वेळ रात्रीची मानली जाते.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही शिलाजित दुधात मिसळून पिऊ शकता. या पद्धतीमुळे शरीराला शिलाजितचे फायदे सहजपणाने मिळतात. जर तुम्हाला मूत्रसंस्थेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच शिलाजितचे सेवन करा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Where and how to find shilajit which helps to boost stamina in men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • health issues
  • Health Tips
  • men stamina

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.