पुरुषांमधील वा महिलांमधील वंध्यत्व दूर करण्यासाठी वरदान ठरतो हा पदार्थ
मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रजनन आरोग्याला चालना देण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध औषधांची मदत घेतात. ही औषधे दीर्घकाळ घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र, या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टींचाही उपयोग होऊ शकतो. तुम्हाला नपुंसकत्व किंवा प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या येत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर Shilajit चे सेवन करावे. शिलाजित हा एक चिकट पदार्थ आहे, जो हिमालयातील खडकांमधून काढला जातो. शिलाजीतचा उपयोग पुरुषत्व वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून केला जातो. हे जरी खरे असले तरीही याचा उपयोग कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये हेदेखील महत्त्वाचे आहे.
अलिगढ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, युपीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पीयूष माहेश्वरी यांनी एका हिंदी संकेतस्थळा याबाबत मुलाखत देताना सांगितले की, शिलाजीत हा अगणित खनिजे आणि इतर जैविक पदार्थांनी बनलेला एक चिकट पदार्थ आहे. त्यात खनिजे, अमीनो अॅसिडस्, जीवनसत्त्वे आणि इतर शक्तिशाली घटक असतात, ज्यामुळे ते आयुर्वेदिक औषधांमध्ये एक महत्त्वाचे औषध ठरते. शिलाजीतचा वापर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो. शिलाजीतच्या सेवनाने शारीरिक दुर्बलता, उर्जेची कमतरता, रक्त प्रवाह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात असेही त्यांनी सांगितले (फोटो सौजन्य – iStock)
फर्टिलिटी बुस्ट करण्यासाठी
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की शिलाजीत हे प्रजनन आरोग्य आणि प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या घटकांनी समृद्ध मानले जाते. याचे सेवन केल्याने तुम्हाला लैंगिक समस्यांपासून खूप आराम मिळतो. शिलाजीतबद्दल असा गैरसमज असतो की ते फक्त पुरुषांसाठीच फायदेशीर आहे. मात्र, शिलाजीत केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे महिलांसाठी एक नैसर्गिक टॉनिक देखील मानले जाऊ शकते. शारीरिक दुर्बलतेने त्रस्त महिलांनी शिलाजीतचे सेवन केल्यास काही आठवड्यांतच त्यांच्या शरीराला नवजीवन मिळू शकते.
40 नंतरही मजबूत करतील Fertility ‘हे’ 5 पदार्थ, महिला आणि पुरुषांनी आहारात समाविष्ट कराच
दुधासह सेवन करणे योग्य
तज्ज्ञांच्या मते शिलाजीतचे सेवन दुधासोबत केल्यास जास्तीत जास्त फायदा होतो. शिलाजित हे द्रव असेल तर त्याचे तीन थेंब दुधात मिसळून प्या. शिलाजीत रात्री जेवल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही खाऊ शकतो. मात्र, शिलाजीत रसात मिसळून वापरू नये. शिलाजीत हे औषधांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते आणि दीर्घकाळ सेवन केले जाऊ शकते. तथापि, एखाद्याने आयुष्यभर याचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे याचा अतिरिक्त आणि नियमित वापर करणे टाळावे
‘विषारी हवा’ बनतेय पुरुषांच्या वंध्यत्वाचं कारण, धक्कादायक अहवालातून कारण समोर
शिलाजितचे फायदे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.