Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?

चपाती असो किंवा भाकरी पारंपरिक आणि पौष्टिक जेवणाचा भाग आहे. मात्र या दोन्हींपैकी पोषणाच्या दृष्टीने भाकरी की चपाती काय जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 12, 2025 | 03:20 AM
चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?
Follow Us
Close
Follow Us:

भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे प्रामुख्याने तांदूळ, गहू, ज्वारी आणि भाकरीचं उत्पादन जास्त होतं. यांचा आहारात देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यातल्या त्यात गहू आणि बाजरी या दोन्ही धान्यांना महत्वाचे स्थान आहे. गव्हाच्या चपात्या आहारात असतातच असतात तसंच बहुतेक घरात बाजरीची भाकरी देखील केली जाते. चपाती असो किंवा भाकरी पारंपरिक आणि पौष्टिक जेवणाचा भाग आहे. मात्र या दोन्हींपैकी पोषणाच्या दृष्टीने भाकरी की चपाती काय जास्त फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

गव्हाची चपाती:
गव्हाच्या पीठात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीराला त्वरित ऊर्जा देते. त्यात थोड्या प्रमाणात प्रथिने, फायबर, बी-समूहातील जीवनसत्त्वे आणि लोह आढळतं. गव्हाची चपाती पचायला हलकी असते आणि रोजच्या आहारासाठी उत्तम पर्याय मानला जातो.

बाजरीची भाकरी:
बाजरी ही पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक धान्य आहे. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. बाजरीमध्ये फायबर जास्त असल्यामुळे ती पचायला थोडी वेळ घेते, परंतु त्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी बाजरीची भाकरी उत्तम मानली जाते कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. तसेच हाडांची मजबुती, हृदयाचे आरोग्य आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी बाजरी फायदेशीर आहे.

वारंवार सांधे दुखतात? मग दह्यात मिक्स करून खा ‘या’ बिया, वयाच्या १०० व्या वर्षी हाडे राहतील मजबूत

काय जास्त फायदेशीर आहे ?

चपातीमधून ऊर्जा पटकन मिळते, पण खनिजे आणि फायबर मर्यादित असतात तर बाजरीची भाकरी पोषक घटकांनी समृद्ध आहे. खासकरुन ज्यांना मधुमेह, हाडांचे विकार किंवा वजन नियंत्रणाची गरज आहे त्यांनी बाजरीची भाकरी जास्त खावी.

गव्हाची चपाती आणि बाजरीची भाकरी या दोन्हींचे आपापले फायदे आहेत. मात्र, “सर्वाधिक पोषक घटक” या दृष्टीने पाहता बाजरीची भाकरी अधिक गुणकारी ठरते. संतुलित आहारासाठी कधी गहू, कधी बाजरी दोन्हीचा समावेश करणं फायदेशीर आहे. यामुळे शरीराला विविध प्रकारचे पोषक घटक मिळतात आणि आरोग्य अधिक चांगले राहते.

भारतातील महिलांच्‍या हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी अँजाइनाबाबत जाणून घ्‍या सविस्तर माहिती

चपातीमधील गुणधर्म

कार्बोहायड्रेट (72g) – पटकन ऊर्जा देतात. श्रम करणारे, खेळाडू यांच्या फिटनेससाठी उपयुक्त आहे.

प्रथिने (12g) – शरीराची वाढीसाठी फायदेशीर

फायबर (10g) – पचनसंस्था सुधारते

कॅल्शियम/लोह – हाडं व रक्तावाढीसाठी फायदेशीर

बाजरीची भाकरी

कॅलरीज (360 kcal) – ऊर्जा जास्त पण दीर्घकाळ टिकते.

फॅट (5g) – गव्हापेक्षा जास्त, पण हेल्दी फॅट.

लोह (8mg) – गव्हापेक्षा दुप्पट लोह असल्याने रक्तवाढीसाठी फायदेशीर आहे.

कॅल्शियम व मॅग्नेशियम जास्त – हाडे व स्नायूंसाठी उत्तम आहे.

बाजरीची भाकरी पचायला वेळ घेते पण दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.

कोणासाठी काय योग्य?

दररोजचा वापर / हलका आहार – गव्हाची चपाती

मधुमेह, हाडांचे विकार, रक्ताल्पता, वजन नियंत्रण – बाजरीची भाकरी

संतुलित आरोग्यासाठी – दोन्ही आळीपाळीने खाणं सर्वोत्तम आहे असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

 

Web Title: Which has more nutrients chapati or bajara bhakri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 03:20 AM

Topics:  

  • Chapati
  • Diet Plan
  • Nutrition

संबंधित बातम्या

गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश
1

गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.