
तरुणांमध्ये का वाढत आहे आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमाणाचे? जाणून घ्या आरोग्यासंबंधित सविस्तर माहिती माहिती
जगभरात कर्करोगाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. कर्करोगाचे रुग्ण वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय शरीरातील कोणत्याही अवयवाला कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील कर्करोगाच्या पेशी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
अलीकडच्या वर्षांत, तरुणांमध्ये आंत्र (बावेल) कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. पारंपरिकतः याप्रकारचा कर्करोग वृद्धांमध्ये अधिक आढळतो, पण आता तरुणांमध्येही हे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. या वयोगटात झालेल्या या बदलामुळे या घडामोडींमागील मूळ कारणांबद्दल महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.डॉ. राज नगरकर, मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी व रोबोटिक सर्व्हिसेस, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांनी यावर सविस्तर माहिती सांगितली आहे.
आंत्र कर्करोग, ज्याला कोलोरेक्टल कॅन्सर असेही म्हणतात, तो कोलन किंवा रेक्टममध्ये होतो. तो बहुतेकदा लहान वाढींमधून (पॉलिप्स) सुरू होतो, जे कालांतराने कर्करोगात रूपांतरित होऊ शकतात. आंत्र कर्कयोगाचा धोका प्रामुख्याने वाढवणारी कारणे जसे कि – वयोमान, कौटुंबिक इतिहास, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि धूम्रपान आहेत. पण तरुणांमध्ये वाढत असलेल्या प्रकरणांमुळे असे सूचित होते की, काही नवीन आणि पूर्वी न दिसलेली कारणे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
लिंच सिंड्रोम (Hereditary Nonpolyposis Colorectal Cancer – HNPCC)हा सिंड्रोम अशा जनुकांतील बदलामुळे होतो जे डीएनए दुरुस्त करतात. या जनुकांमध्ये दोष असल्यास डीएनएमध्ये चुका जमा होतात आणि त्या कर्करोगाला जन्म देतात. लिंच सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना 50 वर्षांपूर्वीच आंत्र कर्करोगाचा धोका असतो आणि ते इतर कर्करोगांसाठीसुद्धा अधिक संवेदनशील असतात (उदा. गर्भाशय, अंडाशय, पोट व मूत्रमार्गातील कर्करोग). जनुकीय चाचणी आणि सल्लामसलत हे अशा व्यक्तींना वेळेत निदान व प्रतिबंधासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
तरुणांमध्ये आंत्र कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. जीवनशैली, पर्यावरणीय घटक, आणि आनुवंशिक घटक (उदा. लिंच सिंड्रोम) ही कारणे एकत्रितपणे या वाढीस कारणीभूत आहेत. योग्य आहार, सक्रिय जीवनशैली, लक्षणांबद्दल जागरूकता, वेळेवर तपासणी आणि आधुनिक उपचारांनी आपण या रोगाचे प्रमाण कमी करू शकतो आणि पुढच्या पिढ्यांचे संरक्षण करू शकतो.