Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या उच्च रक्तदाब वाढल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रोक येण्याआधी दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 05:30 AM
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात 'हे' भयानक बदल

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात 'हे' भयानक बदल

Follow Us
Close
Follow Us:

स्ट्रोकची गंभीर लक्षणे?
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात?
स्ट्रोक येण्याची कारणे?

वातवरणात सतत होणारे बदल, मानसिक ताण, शारीरिक थकवा, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीरात असंख्य बदल दिसून येतात. पण अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात, असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आरोग्यासंबंधित अतिशय भयानक समस्या म्हणजे स्ट्रोक. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला स्ट्रोक येऊ शकतो. भारतात दरवर्षी सुमारे 18 लाख लोकांना स्ट्रोकसारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे तरुण वयातील मुलामुलींमध्ये स्ट्रोक येण्याचे प्रमाण 10 ते 14 टक्क्यांनी वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष करणे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्ट्रोक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटण्याची कारणे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

विटामिन सी युक्त बहुगुणी आवळ्यांपासून बनवा ‘हे’ मूल्यवर्धित पदार्थ, वाढत्या वयात राहाल कायमच हेल्दी

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात?

मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो, त्यावेळी मेंदूच्या रक्तवाहिन्या फुटतात, यालाच स्ट्रोक असे म्हंटले जाते. शरीरात वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे काहीवेळा मेंदूचे गंभीर नुकसान होते. याशिवाय मधुमेह, हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयी स्ट्रोक येण्यास कारणीभूत ठरतात. स्ट्रोक आलेल्या व्यक्तीसाठी प्रत्येक सेकंड आणि प्रत्येक मिनिट अतिशय महत्वाचा असतो. योग्य वेळी उपचार न केल्यास मेंदूला गंभीर होण्यासोबतच काहीवेळा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. या गंभीर आजाराची लक्षणे वेळीच ओळखणे फार गरजेचे आहे

स्ट्रोक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?

  • अशक्तपणा
  • बोलताना अडखळणे
  • चेहऱ्याची एक बाजू लुळी पडणे
  • शारीरक संतुलन गमावणे
  • अंधुक दृष्टी किंवा तीव्र डोकेदुखी, यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
हातापायांना कायमच सूज येते? मग उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल जीवघेणे

स्ट्रोकसाठी धोक्याचे ठरतात हे घटक:

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरण थंड असल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्याच्या परिणामामुळे उच्च रक्तदाब वाढतो आणि स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय कमी पाणी प्यायल्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या होतात. रक्ताच्या गुठळ्या होणे संपूर्ण शरीरासाठी अतिशय धोक्याचे आहे. शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर सर्व अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. तर काहीवेळा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्ट्रोक झाल्यास काय करावे?

    Ans: विलंब न करता त्वरित जवळच्या रुग्णालयात (ज्या ठिकाणी सिटी स्कॅन उपलब्ध आहे) जा.

  • Que: स्ट्रोकचे प्रकार कोणते आहेत?

    Ans: मेंदूत रक्तपुरवठा करणारी नळी ब्लॉक होणे, मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होणे

  • Que: स्ट्रोक टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा

Web Title: Why do brain blood vessels burstthese terrifying changes appear hours before a stroke ignoring them can be fatal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Blood clots
  • blood pressure
  • brain stroke
  • health issues

संबंधित बातम्या

Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर
1

Hypertension म्हणजे काय? वाढत्या उच्च रक्तदाबाचा शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो, जाणून घ्या सविस्तर

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार
2

पोटात अल्सर झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष न करता वेळीच करा उपचार

Lipstick And Cancer: लिपस्टिक लावल्यामुळे खरोखरच कॅन्सर होतो का? जाणून घ्या यामागील वैद्यकीय कारण
3

Lipstick And Cancer: लिपस्टिक लावल्यामुळे खरोखरच कॅन्सर होतो का? जाणून घ्या यामागील वैद्यकीय कारण

वाढत्या वयात कोणतीही सर्जरी झाल्यास ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, राहाल कायमच दीर्घायुषी
4

वाढत्या वयात कोणतीही सर्जरी झाल्यास ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी, राहाल कायमच दीर्घायुषी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.