
फोटो सौजन्य: iStock
थंडी म्हटलं की अनेकांचे बाहेर फिरण्याचे प्लॅन्स बनतात. मग माथेरान, महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. या थंडीच्या मोसमात अनेक जण गोधडीत राहणेच जास्त पसंत करत असतात. थंडीत जुन्या जखमांवरून वेदना होणे, आपली त्वचा फाटणे तसेच ती कोरडी पडणे अशा कॉमन गोष्टी आपल्या सहज लक्षात येतात. पण याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे थंडीत लागणारी जास्त झोप.
नवीन वर्षाच्या पार्टीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा चमचमीत नाचोज प्लेटर, वाचा सोपी रेसिपी
काही भागात थंडीचा जोर वाढतोय तर कुठे तो कमी होत चालला आहे. गुलाबी थंडीत गोधडीची उब सोडून बाहेर पडावं असं कुणाला वाटत नाही. थंडीच्या मोसमात जास्त झोप येणे ही एक सामान्य गोष्ट आहे जी तुमच्या सुद्धा लक्षात आली असेल. या मोसमात अनेकांना वाटते की ते आळशी झाले आहेत, पण तसे नाही आहे. यामागे इतरही अनेक कारणे असण्याची शक्यता आहे. आपण बऱ्याचदा असे गृहीत धरतो की थंड वातावरण म्हणजे कमी तापमान यासाठी जबाबदार आहे, परंतु हे एकमेव कारण नाही. चला हिवाळ्यात जास्त झोप येण्यामागे अनेक कारणे काय आहेत याबद्दल जाणून घेऊया.
सूर्यप्रकाशाचा अभाव: आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचे हार्मोन असते, जे झोपेवर नियंत्रण ठेवते.
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे मेलाटोनिनचे प्रमाण वाढते, परिणामी झोप अधिक होते.
अंधार आणि झोप: जेव्हा अंधार पडतो तेव्हा शरीर झोपेची वेळ झाल्याचे संकेत देत असते. हिवाळ्यात लवकर अंधार पडत असल्याने जास्त झोप लागते.
थंडीपासून संरक्षण: हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. ऊर्जा वाचवण्यासाठी शरीर झोपेचे सिग्नल देऊ लागते.
शारीरिक हालचालींमध्ये घट: हिवाळ्यात लोक कमी बाहेर जातात आणि शारीरिक हालचाली देखील कमी करतात. त्यामुळे शरीराला कमी थकवा येतो आणि जास्त झोप लागते.
व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशापासून तयार होतो. पण वर नमूद केल्याप्रमाणे, हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाश असतो, ज्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता उद्भवू शकते. यामुळे थकवा आणि झोप लागते. व्हिटॅमिन डी हे शरीरातील ऊर्जा पातळी राखण्यास मदत करते.
खाण्याच्या सवयी: हिवाळ्यात लोक जास्त गरम आणि हेव्ही फूड खातात. त्यामुळे शरीराला अन्न पचायला जास्त वेळ लागतो आणि झोप येते.
तणाव: हिवाळ्यात तणाव वाढू शकतो, ज्यामुळे जास्त झोपही येऊ शकते.
आजार: सर्दी-खोकला यांसारख्या आजारांमुळेही शरीर थकून जाते, ज्यामुळे जास्त झोप येऊ शकते.