कच्च दूध त्वचेला लावण्याचे फायदे
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. कारण वाढत्या वयानुसार चेहऱ्यामध्ये होणारे बदल, प्रदूषण, धूळ, माती, हार्मोन्स असंतुलन इत्यादी गोष्टींमुळे महिलांचे आरोग्य बिघडून जाते. हल्ली कमी वयातच महिलांमध्ये मुरुम, ब्लॅकहेड्स, सुरकुत्या, पिगमेंटेशन इत्यादी त्वचेसंबंधित समस्या जाणवू लागल्या आहेत. त्वचेसंबंधित समस्या जाणवू लागल्यानंतर महिलांची त्वचा खराब होऊन जाते. खराब झालेली त्वचा पुन्हा एकदा उजळ्वण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात.(फोटो सौजन्य-istock)
त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिला काहीवेळा बाजारात उपलब्ध असलेले महागडे क्रीम, फेशिअल, क्लीनप इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र कालांतराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. केमिकल प्रॉडक्टचा अतिप्रमाणात वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कच्च्या दुधात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सांगणार आहोत. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा सुंदर दिसेल.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कच्च्या दुधात आढळून येणारे घटक त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. दैनंदिन आहारात दुधाचा वापर केला जातो. शिवाय कच्चे दूध त्वचेचा बदलेला रंग सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतो. यामध्ये आढळून येणारे लॅक्टिक ऍसिड त्वचा एक्सफोलिएंट करते. शिवाय त्वचेवर मृत पेशी काढून टाकण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. कच्च्या दुधात आढळून येणारे दाहक विरोधी गुणधर्म त्वचेवर जळजळ, पुरळ कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा.
कच्चे दूध आणि मध मिक्स करून तुमची त्वचेवर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा अतिशय मुलायम आणि सुंदर होईल. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे कोरडी पडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. यासाठी वाटीमध्ये 2 चमचे कच्चे दूध घेऊन त्यात 1 चमचा मध टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं ठेवा. हा उपाय आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कच्च्या दुधामध्ये कॉफी पावडर मिक्स करून लावल्यास त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. शिवाय त्वचेचा टोन सुद्धा बदलतो. यासाठी वाटीमध्ये 2 चमचे कॉफी पावडर घेऊन त्यात कच्चे दूध टाकून मिक्स करा. जास्त पातळ मिश्रण तयार करू नये. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं हलक्या हाताने मसाज करून नंतर 5 मिनिटं ठेवून चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा उजळदार होईल.