
गणपती बाप्पाला मोदक का आहेत प्रिय? जाणून घ्या पारंपरिक प्रसादाचा रंजक आणि महत्वपूर्ण इतिहास
गणपती बाप्पाला नैवेद्यात मोदक का दाखवतात?
मोदकांचा इतिहास?
मोदकांना का आहे विशेष महत्व?
गणपती बाप्पा आणि मोदक हे नातं अगदी लहानपणापासून आपण सगळेच पाहत आलोय. पण हे मोदक खाताना कधी मोदकाचा इतिहास जाणून घेतलाय का? मोदकाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो! पण आज आपण खातो तोच उकडीचा मोदक तेव्हाही होता का? दक्षिण भारतातील कोळकटै, कडबू, कुडुमु आणि पूर्व भारतातील पीठा यांचा मोदकाशी काही संबंध आहे का? आता हीच रंजक गोष्ट आपण जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
पुराणकथांमध्ये मोदकाचा उल्लेख नक्की कुठे आढळतो. उकडीचा मोदक कसा आणि कधी प्रचलित झाला? तर मोदकाचा उल्लेख हा प्राचीन भारतीय साहित्य आणि आयुर्वेदिक ग्रंथपरंपरांमध्ये आढळतो. पण प्राचीन मोदक हा उकडीचाच होता असं म्हणता येणार नाही.
लोकप्रिय पुराणकथांनुसार, कार्तिकेय आणि गणपतीमध्ये दिव्य मोदक मिळविण्यासाठी जी स्पर्धा रंगली, त्यात बाप्पाने आपल्या आईवडिलांभोवती प्रदक्षिणा घालत ही स्पर्धा जिंकली आणि त्यांना मोदक मिळाला. तर दुसरी कथा अनसूयेची सांगितली जाते. या कथेनुसार अत्री ऋषींची पत्नी अनसूयाने भगवान शिव, पार्वती आणि गणेश यांना भोजनाचे निमंत्रण दिले पण गणेशाची भूक भागत नसल्याने त्यावेळी तिने मोदक बनवून दिले आणि बाप्पा खूश झाले. त्यानंतर त्यांनी २१ ढेकर दिले. आणि यानंतरच २१ मोदकांची नेवैद्याची परंपरा सुरू झाली. ही धार्मिक लोककथा आहे.
उकडीचा मोदक कधी आला? तर याचा काही ठोस पुरावा नाही. तांदळाची पारी, गोड सारण, वाफवणे या स्वरूपाचा मोदक महाराष्ट्रात कधी रूढ झाला याचा थेट पुरावा नाहीये. दरम्यान रामायण, महाभारत, सुश्रुतसंहिता यामध्ये मोदक शब्दाचा उल्लेख आढळतो. मानसोल्लासमध्ये मध्ययुगीन पाकपरंपरेतीही उल्लेख आढळतो. कोकणात उकडीचे तर विदर्भात तळणीचे मोदक करतात. मोदकाची चव ही भौगोलिक खाद्यपरंपरेशी जोडली गेली आहे. आता याचं स्वरूप आधुनिक झालंय पण उकडीचा मोदक सर्वांच्याच आवडीचा ठरतो
Ans: पौराणिक कथांमध्ये मोदकाला ज्ञान, आनंद आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याची धार्मिक श्रद्धा आहे.
Ans: गणेशोत्सवात मोदक हा बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यांपैकी एक मानला जातो. विशेषतः महाराष्ट्रात उकडीचे मोदक मोठ्या भक्तिभावाने अर्पण केले जातात.
Ans: गणपतीच्या अनेक पौराणिक कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आढळतो. ज्ञानाचे प्रतीक म्हणून मोदकाला विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यामुळे त्याचा गणपतीच्या पूजेशी संबंध दृढ झाला.