
उन्हाळ्यात का वाढतो किडनी स्टोनचा धोका? जाणून घ्या यामागील कारणे आणि स्टोन नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय
किडनी स्टोन होण्याची कारणे?
उन्हाळ्यात स्टोन का वाढतो?
किडनी स्टोनची लक्षणे कोणती?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. सतत येणाऱ्या घामाच्या धारांमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. घामामुळे शरीरातील पाण्यासोबतच क्षारांची पातळी सुद्धा कमी होऊन जाते. ज्यामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर किडनी स्टोनची समस्या उद्भवते. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात प्रचंड वेदना होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किडनी स्टोनची समस्या का उद्भवते? किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी उपाय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
तापमानात वाढ झाल्यानंतर शरीर स्वत:ला थंड ठेवण्यासाठी जास्तीचा घाम शरीरातून बाहेत काढून टाकतो. या दरम्यान योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यास शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीमध्ये स्टोन वाढू लागतो. ज्यावेळी घामावाटे शरीरातील विषारी घटक आणि पाणी बाहेर पडून जाते, तेव्हा शरीरात पाण्याची पातळी वाढवणे फार आवश्यक असते. पण याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. किडनी फिल्टर करताना हेच विषारी घटक साचून राहिल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होऊन जाते.याशिवाय किडनीमध्ये कॅल्शिअम, ऑक्सालेट आणि यूरिक ऍसिड युक्त घटक जमा होण्यास सुरुवात होते. हे घटक हळूहळू स्टोनमध्ये रूपांतरित होतात.
किडनी स्टोनचा धोका कमी पाणी पिणाऱ्या लोकांना जास्त असतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पूर्वी स्टोन झाल्यास धोका वाढण्याची शक्यता असते. तसेच जास्त मिठाचे सेवन, मांसाहारी पदार्थांचे सेवन, ऑक्सालेट असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे किडनी स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा पुन्हा पुन्हा यूरिनरी ट्रॅक्स इन्फेक्शन झाल्यामुळे किडनी स्टोन होऊन आरोग्य बिघडते.
किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी नियमित ४ ते ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. यासोबतच नारळ पाणी, लिंबू पाण्याचे सेवन करावे. दैनंदिन आहारात नियमित फळांचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जास्त मीठ, तिखट, तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.
Ans: पायांवर, घोट्याला किंवा डोळ्यांभोवती सूज येणे, अचानक खूप थकवा जाणवणे.
Ans: सततच्या उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या रक्तवाहिन्या कमकुवत होतात.
Ans: रक्तातील क्रिएटिनिन (Creatinine) आणि युरियाची पातळी तपासणे.