यापूर्वी याच रुग्णालयात किडनी विक्रीतील एजंट हिमांशू भारद्वाज तसेच उत्तर प्रदेशातील पीडित मोहम्मद तारीक खान यांचीही किडनी काढल्याचे समोर आले होते. या पाचही जणांचे जबाब चंद्रपूर पोलिसांनी नोंदविले आहेत.
नागभीड तहसीलमधील मिंथूर गावातील रहिवासी रोशन कुडे यांना कर्ज फेडण्यासाठी बेकायदेशीर सावकारांनी त्यांची किडनी विकण्यास भाग पाडले होते. त्यानंतर ते परदेशात कंबोडियाला गेले.
किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे आणि सत्यवान रामरतन बोरकर अशी अटकेतील आरोपी सावकारांची नावे आहेत.