Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पोट फुगणे (ब्लोटिंग) ही समस्या आजकाल खूप सामान्य झाली आहे. योग्य आहार आणि सवयी बदलल्यास या त्रासापासून आराम मिळवता येऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 01, 2026 | 08:15 PM
Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • पोट फुगणे मुख्यतः पचनक्रिया बिघडल्यामुळे आणि गॅस साचल्यामुळे होते.
  • घाईघाईने खाणे, कमी पाणी पिणे आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने हा त्रास वाढतो.
  • हळूहळू खाणे, भरपूर पाणी पिणे आणि फायबरयुक्त आहार घेतल्याने पोटफुगी कमी होते.
चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पोटाच्या समस्या जाणवू लागतात. यात पोट फुगणे या समस्येचाही समावेश होतो. पोट फुगणे एक सामान्य समस्या वाटतं असली तरी हा त्रास सतत जाणवत असल्यास वेळीच यावर उपाययोजना करणे गरजेचे ठरते. तज्ज्ञांच्या मते, पचनक्रिया बिघडल्यामुळे असे घडते. परंतु बऱ्याचदा असे होते की, आपण कमी, हलका आहार घेतल्यानंतरही ब्लोटींग (पोटफुगीचा) त्रास जाणवू लागतो. आता असे का होते तर त्याचे मूळ कारण म्हणजे आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी. कोणत्याही वेळी खाणे, अति खाणे, कमी पाण्याचे सेवन आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे यामुळे जेवणानंतर जडपणा जाणवू लागतो. याचबरोबर जर रोजच्या जीवनात जर तुम्ही मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन करत असाल तर अशावेळीही तुम्हाला हा त्रास सातत्याने जाणवून शकतो. चला पोटफुगीपासून आराम मिळवण्यासाठी काय उपाय करता येतील ते जाणून घेऊया.

लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?

पोट फुगणे म्हणजे काय?

पोट फुगणे हा एक असा त्रास आहे ज्यात अचानक पोटात जडपणा जाणवू लागतो. ही समस्या बाहेरुन दिसत नाही पण शरीराच्या आत ती आपल्याला जाणवत असते. पोट बाहेरून फुगलेले दिसत नाही, पण आतून जडपणा, घट्टपणा आणि दाब जाणवतो. हे सहसा पोटात जमा झालेल्या गॅसमुळे होत असते. तज्ञांच्या मते, कधीकधी खूप कमी खाल्ल्याने देखील हे होऊ शकते. कमी खाल्ल्यानंतरही हा त्रास जाणवत असल्यास याचे मूळ कारण तुमच्या शरीरात होणाऱ्या प्रक्रिया असू शकतात. तुमच्या शरीराच्या आत काय घडत आहे किंवा ते अन्न पचवण्यासाठी किती वेळ घेत आहे यावर ते अवलंबून असते.

पोट फुगणे समस्या झालीये सामान्य

आधुनिक जीवनशैलीत लोकांचा बाहेरील तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्याकडे कल अधिक वाढला आहे. यामुळे अनेकांचे पाैष्टिक आहाराकडे कमी लक्ष जाते. घाईघाईने जेवणे आणि कामाचे लांब दिवस यांसारख्या अनेक घटकांमुळे पचनक्रिया बिघडते. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले की, विशेषत: भारतीयांमध्ये पचनाच्या समस्या अधिक आढळून येतात.

थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट फुगणे

अनेकदा कमी आहार घेतल्यानंतरही पोट जड होऊ लागते किंवा पोटाचा फुगा झाला आहे असे आपल्याला जाणवू लागते. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही किती खाता यावर नाही, तर तुम्ही कसे खाता यावर बरेच काही अवलंबून असते. खूप घाईघाईने खाल्ल्याने अन्न नीट पचले जात नाही. यामुळे अन्नाचे कण आतड्यांमध्ये अडकतात. खूप घाईने चावल्याने एन्झाइम्समध्ये अडथळा येतो, म्हणूनच पोटात जडपणा जाणवणे ही एक सामान्य समस्या आहे.

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

पोट फुगणे कमी करण्यासाठी उपाय

जर तुम्हाला पोट फुगल्याचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे टाळण्यासाठी, तुमच्या खाण्याच्या सवयी बदला आणि अन्न व्यवस्थित चावून खायला सुरुवात करा. जेवताना थोडा वेळ काढा आणि हळूहळू प्रत्येक खास व्यवस्थित चावून खा. याव्यतिरिक्त आहारात भरपूर पाण्याचा समावेश करा. आपल्या आहारात फायबरचा समावेश फायद्याचा ठरतो, अशावेळी फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स, डाळी, शेंगा, नट्स, बिया, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. शीरीरिकदृष्ट्या स्वत:ला बळकट बनवा आणि रोज थोडा व्यायाम करा किंवा किमान अर्धा तास चाला.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why does your stomach constantly bloat even after eating little lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • bloating
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
1

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
4

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.