Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात डोळे देखील सांभाळा ! योग्य काळजी न घेतल्या वाढेल इन्फेक्शनचा धोका

उन्हाळा म्हटलं की अनेक आपल्या शरीराची विशेष काळजी घेताना दिसतात. पण या मोसमात तुम्ही तुमच्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 04, 2025 | 09:35 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्यात अनेकदा सुट्ट्यांच्या निमित्ताने आपण सर्वेच जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतो. पण अशावेळी बाहेर पडताना आपण आपल्यासोबत नेहमीच पुरेश्या प्रमाणात पाणी, सन स्क्रीन आणि इतर गोष्टी ठेवत असतो. कित्येक जण उन्हाळयात आपली स्किन टॅन होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेत असतात. पण याच मोसमात फक्त त्वचेची नाही तर डोळ्यांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात जर आपण आपल्या डोळ्यांची नीट काळजी घेतली नाही तर मग यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. तीव्र सूर्यप्रकाश, धूळ, घाम आणि संसर्ग निर्माण करणारे विषाणू आणि बॅक्टेरिया एकत्रितपणे डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

प्रोटीनसाठी दररोज चिकन खाताय? तर सावधान! मृत्यू येतोय जवळ, नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा

उन्हाळ्यात डोळ्यांचे इन्फेक्शन कसे वाढते?

तीव्र सूर्यप्रकाश आणि UV किरणे

सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांची नाजूक त्वचा आणि रेटिनाचे नुकसान होऊ शकते. तसेच UV किरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा आणि संसर्ग होऊ शकतो.

धूळ आणि प्रदूषण

उन्हाळ्यात हवेत उडणारी धूळ आणि घाण डोळ्यांत जाऊ शकते, जे जळजळ, खाज आणि लालसरपणा निर्माण करू शकते, ज्यामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा एलर्जिक रिएक्शन निर्माण करू शकतो.

डोळ्यांना घामाने आणि घाणेरड्या हातांनी स्पर्श करणे

उन्हाळ्यात, घामामुळे आपण अनेकदा हात न धुता डोळ्यांना स्पर्श करतो, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणू डोळ्यांपर्यंत पोहोचतात.

लग्नाचा विचार सुरु आहे? आधी जोडीदाराला तपासा मगच पुढचं पाऊल टाका… आयुष्याचं सोनं होईल

दूषित पाण्याचा वापर

उन्हाळ्यात अनेक जण थंड पाण्यात पोहण्यास प्राधान्य देतात. हे क्लोरीनयुक्त किंवा दूषित पाणी डोळ्यांत जाऊ शकते. परिणामी, डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.

उन्हाळ्यात त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कलिंगडच्या सालीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमध्ये टिकून राहील ओलावा

संसर्गापासून तुमचे डोळे कसे सुरक्षित ठेवावेत

  • UV प्रोटेक्टेड असलेले चष्मे डोळ्यांचे सूर्यप्रकाश आणि धुळीपासून संरक्षण करते. यामुळे संसर्ग आणि थकवा यापासूनही आराम मिळतो.
  • हात न धुता डोळ्यांना स्पर्श करणे किंवा चोळणे हे संसर्ग पसरवण्याचे एक प्रमुख कारण आहे.
  • दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुतल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि घाणही निघून जाते.
  • दुसऱ्याचा रुमाल, टॉवेल किंवा काजळ वापरू नका. यामुळे बॅक्टेरिया पसरतात.
  • मोबाईल किंवा लॅपटॉपकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळे कोरडे पडतात. त्यामुळे दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी दुसरीकडे पहा.
  • पाण्यात पोहल्यानंतर लगेच डोळे स्वच्छ पाण्याने धुवा आणि काही जळजळ झाल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why eyes infection cases are increasing in summer season what are the eye care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • eye infection
  • Happy Lifestyle
  • summer care tips

संबंधित बातम्या

Never Give Up Day 2025 : अपयशातून यश मिळवणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास
1

Never Give Up Day 2025 : अपयशातून यश मिळवणाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल
2

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

गेलेली नजर होईल घारीसारखी तीक्ष्ण! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, कधीच लागणार नाही चष्मा
3

गेलेली नजर होईल घारीसारखी तीक्ष्ण! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, कधीच लागणार नाही चष्मा

रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात
4

रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.