फोटो सौजन्य - Social Media
लग्नाचा सिझन सुरू आहे. अनेकांच्या घरात लग्नसराई सुरू झाली असेल. अशा मध्ये अनेक कपल्स आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील. एकमेकांना लग्न बंधनात बांधून घेण्याचा विचार करत असतील. एकत्र येताय, आयुष्यभर सोबत राहण्याचे एकमेकांना वचन देताय… ते सगळं उत्तम आहे. परंतु, तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर एकत्र येण्याचा विचार करतात तो व्यक्ती खरंच योग्य आहे का? अशा गोष्टी तपासणे फार महत्त्वाचे असते. कारण तुम्ही त्या व्यक्तीबरोबर आयुष्यभराची गाठ बांधणार आहात. चला तर मग पाहूयात, आपण आपल्या जोडीदारामध्ये कोणत्या बाबी तपासल्या पाहिजेत…
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर जन्ममरणाचे शपथा घेतो, तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्या सोबत आयुष्यभरासाठी असतो. लग्न करण्या अगोदर एकदा स्वतःला हा प्रश्न करा की खरंच त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला आवडतो? कारण रूप हे काही काळासाठी टिकतं पण एखाद्या व्यक्तीचा असलेला स्वभाव हा कालांतर रूपी टिकून राहतं. त्यामुळे एखाद्याचं रूप पाहण्यापेक्षा त्याचा स्वभाव पहा आणि योग्य तो निर्णय घ्या.
दुसरी गोष्ट म्हणजे सन्मान! तो व्यक्ती तुमचा किती सन्मान करतो? तो त्याच्या कुटुंबीयांचा किती सन्मान करतो? तसेच त्याला त्याच्या आई-वडिलांबद्दल काय भावना आहेत? या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. कारण जो व्यक्ती आपला कुटुंबीयांचा सन्मान करतो, आपला आई-वडिलांचा सन्मान करतो, तो व्यक्ती नक्कीच तुमचाही सन्मान करेल. महिलांनी पुरुषांना तपासताना त्याचे महिलांबद्दलचे दृष्टिकोन तपासा. मुलगा असो वा मुलगी, दोघांनाही आर्थिक शिस्त महत्वाची असते. आपला जोडीदार किती कमावतो यावरून निर्णय कधीच घेऊ नका त्यापेक्षा तो कमावलेल्या पैशांमध्ये कसा राहतो? किती बचत करतो? एकंदरीत त्याचे असलेले नियोजन महत्त्वाचे असते. जर तो व्यक्ती जबाबदार असेल तर नक्कीच तो योग्य आहे.
जोडीदार जर आयुष्यभरासाठी निवडत असाल तर तो जबाबदार असणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही लग्न बंधनात जाता तेव्हा तुम्ही एकमेकांची जबाबदारी घेता. त्यामुळे संकटाच्या वेळी आपला जोडीदार आपल्यासोबत असतो का की पळून जातो? या बाबी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. जोडीदार हा स्मार्ट आणि सुंदर असण्यापेक्षा सहनशील आणि समजूतदार असणे जास्त गरजेचं आहे. आपल्या भावना आणि अपेक्षा पाहण्याऐवजी होणाऱ्या जोडीदाराचा विचार, त्याचे सवयी आणि मूल्य पहा आणि आपल्या आयुष्याचे सोने करा.