
दिवाळीच्या आंनदासोबतच डोळ्यांची सुद्धा घ्या काळजी! फटाक्यांपासून संरक्षणासाठी 'या' टिप्स करा फाॅलो
Diwali Eye Safety: दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. दिव्यांची रोषणाई, सुंदर रांगोळ्या, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. मात्र, या आनंदाच्या उत्सवात आपण आपल्या डोळ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो. फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती या गंभीर स्वरूपाच्या असू शकतात आणि काही वेळा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याची वेळही येऊ शकते. याविषयी डॉ. श्रुती वासनिक, कन्सल्टंट ऑप्थॅल्मोलॉजिस्ट, (कॉर्निया, मोतीबिंदू आणि रिफ्रॅक्टिव्ह सेवा), कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI)
लक्षात ठेवा, डोळ्यांना झालेली दुखापत सुरुवातीला किरकोळ वाटली तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही दुखापत झाल्यास तपासणीसाठी विलंब करू नये.
Ans: फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवा, संरक्षक चष्मा वापरा आणि फटाके पेटवताना चेहरा त्यांच्यापासून दूर ठेवा.
Ans: फटाक्यांच्या ठिणग्या, धूर आणि रासायनिक कणांमुळे डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, कॉर्नियाला इजा किंवा गंभीर दुखापत होऊ शकते.
Ans: डोळे चोळू नका. स्वच्छ पाण्याने हलकेच डोळे धुवा आणि तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.