Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eye Safety During Diwali: सावध राहा, सुरक्षित साजरा करा दिवाळी! फटके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने घ्या काळजी

Eye Safety During Diwali: फटाके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण डोळे अतिशय नाजूक असतात. फटाक्यांची अगदी छोटी ठिणगी किंवा कणदेखील डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे, तर आसपास उभ्या असलेल्या व्यक्तींनाही डोळ्यांच्या दुखापतींचा धोका असतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2026 | 03:30 PM
सावध राहा, सुरक्षित साजरा का दिवाळी! फटके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून या पद्धतीने घ्या काळजी

सावध राहा, सुरक्षित साजरा का दिवाळी! फटके फोडताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून या पद्धतीने घ्या काळजी

Follow Us
Follow Us:

Eye Safety During Diwali: दिवाळी हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या मनात आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण होते. दिवाळीच्या दिवशी लोक दिवे लावतात, घरांची सजावट करतात, मिठाईचा आस्वाद घेतात आणि फटाके फोडतात. प्रकाशाचा हा सण कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला एकत्र आणतो. मात्र, या उत्साहात अनेकदा फटाक्यांमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या काळात होणाऱ्या फटाक्यांच्या अपघातांमध्ये डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापतींमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Shivaji Park : ‘जब दीप जले आना’च्या सुरांनी रंगली दिवाळी संध्या; राज ठाकरे यांच्या हस्ते अशोक पत्कींचा सन्मान

डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि हेड ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस डॉ. वंदना जैन सांगतात, “दिवाळी हा आनंदाचा आणि उत्सवाचा काळ असला, तरी या उत्साहात डोळ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती या किरकोळ जळजळ आणि भाजण्यापासून ते दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या गंभीर दुखापतींपर्यंत असू शकतात. मुलांवर नेहमीच प्रौढांनी लक्ष ठेवावे, फटाके केवळ मोकळ्या जागेत फोडावेत आणि सर्वांनी सुरक्षित अंतर राखावे. डोळ्यांना दुखापत झाल्यास डोळे चोळू नयेत किंवा घरगुती उपाय करू नयेत, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. थोडीशी सावधगिरी बाळगल्यास दिवाळीचा आनंद सर्वांसाठी सुरक्षित आणि आनंददायी राहू शकतो.”

फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या दुखापती

डोळे हा मानवी शरीरातील अत्यंत नाजूक अवयवांपैकी एक आहे. फटाक्यांची अगदी छोटी ठिणगी किंवा कणदेखील डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. फटाके फोडणाऱ्या व्यक्तींनाच नव्हे, तर आसपास उभ्या असलेल्या व्यक्तींनाही डोळ्यांच्या दुखापतींचा धोका असतो.

दिवाळीच्या काळात डोळ्यांना होणाऱ्या सामान्य दुखापती पुढीलप्रमाणे आहेत:

  • कॉर्नियावर ओरखडे : फटाक्यांचे लहान कण, राख किंवा ठिणग्या डोळ्यांच्या पारदर्शक बाह्य पटलावर (कॉर्निया) परिणाम करू शकतात. त्यामुळे वेदना, लालसरपणा, डोळ्यांतून पाणी येणे आणि प्रकाश सहन न होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
  • डोळ्याचा गोळा फुटणे : फटाक्यांच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र दाबामुळे डोळ्याच्या आतील संरचनेला गंभीर इजा होऊन डोळ्याचा गोळा फुटू शकतो.
  • भाजल्यामुळे होणाऱ्या दुखापती : गरम ठिणग्या किंवा ज्वालांमुळे पापण्या, पापण्यांचे केस आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला भाजण्याची इजा होऊ शकते.
  • कंजंक्टिव्हाला भाजल्यामुळे होणारी इजा : उष्णता किंवा रासायनिक पदार्थांमुळे डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ पडद्याला (कंजंक्टिव्हा) इजा होऊ शकते.
  • डोळ्यांत बाह्य कण जाणे : धूळ, राख, फटाक्यांचे अवशेष किंवा स्फोटातून उडणारे कण डोळ्यांत गेल्यास जळजळ आणि इतर गंभीर नुकसान होऊ शकते.
  • डोळ्याच्या आतील रक्तस्राव : फटाक्यांच्या स्फोटामुळे डोळ्यांतील नाजूक रक्तवाहिन्यांना इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो.
  • रेटिनाला होणारी इजा : फटाक्यांच्या तीव्र स्फोटामुळे डोळ्यांच्या रेटिनाला गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे दृष्टी धूसर होणे किंवा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचा धोका असतो.
  • रासायनिक दुखापती : जास्त रासायनिक घटक असलेल्या फटाक्यांमधील पदार्थ डोळ्यांत गेल्यास जळजळ किंवा भाजण्याची इजा होऊ शकते.

दिवाळीत डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • फटाके नेहमी मोकळ्या जागेत फोडावेत. योग्य संरक्षणात्मक साधने वापरावीत आणि फटाके हाताळल्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
  • फटाके पेटवताना हाताच्या अंतराएवढे सुरक्षित अंतर राखावे आणि फटाके पाहताना किमान पाच मीटर अंतर ठेवावे. फटाके चेहऱ्याजवळ धरू नयेत किंवा त्यांच्यावर वाकून पाहू नये.
  • फटाके फोडण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवाव्यात. सिंथेटिक कपडे घालणे टाळावे आणि फटाके फोडताना योग्य पादत्राणे वापरावीत.
  • वापरलेले फटाके फेकून देण्यापूर्वी पाण्याच्या बादलीत भिजवून पूर्णपणे निष्क्रिय करावेत.
  • फटाके चेहरा, केस आणि कपड्यांपासून दूर ठेवावेत.
  • अपघाताने आग लागल्यास वापरण्यासाठी पाणी आणि वाळूची बादली जवळ ठेवावी.
  • फटाके बंद पेटीत आणि मुलांच्या आवाक्याबाहेर, सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
  • न फुटलेला फटाका हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तो अचानक पेटू शकतो. त्याच्या जवळ लगेच जाऊ नये किंवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
  • फटाके हाताळल्यानंतर डोळे आणि चेहरा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवावेत.
  • मुलांना प्रौढांच्या देखरेखीशिवाय फटाके फोडू देऊ नये.

डोळ्यांना दुखापत झाल्यास काय करावे?

फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. मात्र, दृष्टीचे संरक्षण करण्यासाठी काही प्राथमिक उपाय उपयुक्त ठरू शकतात.
  • धूर, धूळ किंवा राखेमुळे डोळ्यांना जळजळ होत असल्यास डोळे चोळू नका. त्यामुळे जळजळ वाढू शकते आणि डोळ्यांना अधिक इजा होऊ शकते. डोळे किमान २० मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवा. जळजळ कमी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
  • हात स्वच्छ धुतल्याशिवाय डोळ्यांना स्पर्श करू नका.
  • डोळ्यांत गेलेले कण किंवा बाह्य वस्तू स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नका.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मलम, आय ड्रॉप्स किंवा घरगुती उपाय वापरू नका.
  • डोळ्यांत काहीतरी घुसल्याची किंवा डोळ्याला छेद झाल्याची शंका असल्यास डोळे धुवू नका किंवा त्यावर दाब देऊ नका. डोळ्यावर कोणताही दाब न देता कठीण संरक्षक कवच ठेवून तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.
फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास, दुखापत किरकोळ वाटत असली किंवा दृष्टी सामान्य असली, तरी वैद्यकीय मदत घेण्यास विलंब करू नये. फटाक्यांच्या अपघातानंतर वेदना, लालसरपणा, धूसर दिसणे, प्रकाश सहन न होणे किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.

Diet Control: दिवाळीत वजन नियंत्रणासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? तज्ज्ञांनी दिला सल्ला

डोळ्यांना दुखापत झाल्यास त्वरित मदत मिळावी यासाठी आम्ही आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिली आहे. कृपया 95949 03809 या क्रमांकावर संपर्क साधा चला, ही दिवाळी अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी बनवूया!

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीत फटाके फोडताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

    Ans: फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवावे. शक्य असल्यास योग्य दर्जाचे प्रोटेक्टिव्ह सेफ्टी गॉगल्स वापरावेत. फटाक्यांच्या अगदी जवळ चेहरा नेणे टाळावे.

  • Que: फटाक्यांमुळे डोळ्यांना कोणत्या प्रकारच्या इजा होऊ शकतात?

    Ans: फटाक्यांच्या ठिणग्या, धूर आणि उडणाऱ्या कणांमुळे डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, कॉर्नियाला इजा किंवा गंभीर परिस्थितीत दृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो.

  • Que: फटाक्यांची ठिणगी डोळ्यात गेल्यास काय करावे?

    Ans: डोळा चोळू नये किंवा त्यावर दाब देऊ नये. डोळ्यात अडकलेला कण स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने नेत्रतज्ज्ञ किंवा जवळच्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रात जावे.

Web Title: Eye safety during diwali how to protect your eyes while bursting firecrackers sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • eye care
  • eye infection

संबंधित बातम्या

Dia Mirza Controversy : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
1

Dia Mirza Controversy : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Diwali Rangoli Designs: दिव्यांच्या प्रकाशात अंगण दिसेल उठावदार! कमी वेळात काढा ‘या’ सुंदर रांगोळी
2

Diwali Rangoli Designs: दिव्यांच्या प्रकाशात अंगण दिसेल उठावदार! कमी वेळात काढा ‘या’ सुंदर रांगोळी

Dhanteras 2026:  धन-संपत्तीच्या पूजेसाठी सज्ज व्हा! सोने-चांदी खरेदी, लक्ष्मी-कुबेर पूजेचे शुभ मुहूर्त एका क्लिकवर
3

Dhanteras 2026: धन-संपत्तीच्या पूजेसाठी सज्ज व्हा! सोने-चांदी खरेदी, लक्ष्मी-कुबेर पूजेचे शुभ मुहूर्त एका क्लिकवर

Diwali 2026: दिवाळीच्या रात्री मुख्य दारावरच का लावले जातात दिवे? 99% लोकांना माहीतच नाही रहस्य
4

Diwali 2026: दिवाळीच्या रात्री मुख्य दारावरच का लावले जातात दिवे? 99% लोकांना माहीतच नाही रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.