व्हॅलेंटाईन वीकमध्ये पहिल्याच दिवशी का साजरा केला जातो रोझ डे?
Rose Day Celebration: व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 7 फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवशी जोडपी एकमेकांबद्दल असलेले प्रेम पुन्हा नव्याने व्यक्त करतात. तसेच रोझ डे च्या दिवशी पार्टनरला गुलाबाची सुंदर सुंदर फुल दिली जातात. गुलाबाची फुल देऊन प्रेम व्यक्त केले जाते. याशिवाय गुलाबाचे फुल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. अनेक जोडपी या दिवशी एकमेकांना गुलाबाची फुल किंवा गुलाबपुष्प देऊन हा दिवस साजरा करतात. प्रत्येक जोडपी वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. मात्र रोज डे कधीपासून साजरा करण्यात आला? या दिवसाचा नेमका इतिहास काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
Valentine Day 2025 Special: आता IRCTC करणार तुमची मदत, गर्लफ्रेंडसोबत स्वस्तात करू शकता गोव्याची सफर
मुघल काळापासून रोज डे साजरा केला जात होता. याविषयी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माहिती वाचायला मिळेल. असे सांगितले जाते की, मुघल बेगम नूरजहांक यांना लाल रंगाची गुलाब खूप जास्त आवडायची. त्यामुळे त्यांचे पती त्यांच्या बेगमला खुश करण्यासाठी दररोज एक टन गुलाबाची फुले पाठवत होते. यामुळे नूरजहाँ खूप जास्त खुश झाल्या होत्या. याशिवाय, राणी व्हिक्टोरियाच्या काळात लोकांनी एकमेकांना प्रभावित करण्यासाठी गुलाबाची फुले देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू ही प्रथा जोडप्यांमध्ये लोकप्रिय झाली. त्या दिवसापासून सर्वच जोडपी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर करू लागले.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये पहिल्याच दिवशी का साजरा केला जातो रोझ डे?
रोज डे दुसरी कथा राणी व्हिक्टोरियाच्या काळातील आहे. यावर असे म्हंटले जाते की, राणी व्हिक्टोरियाच्या काळात अनेक लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर करत होते. त्यामुळे ही प्रथा कायम चालू ठेवण्यासाठी व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्याच दिवशी रोज डे साजरा केला जाण्याची प्रथा कायम तशीच ठेवण्यात आली आहे.
लाल रंगाच्या गुलाबाचे किंवा इतर रंगाचे गुलाबाचे सुंदर फुल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय अनेक लोक प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक म्हणून एकमेकांना गुलाबाचे फूल देतात. याशिवाय व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्याच दिवशी रोज डे साजरा करताना आपल्या आवडीच्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल किंवा गुलाबपुष्प देऊन प्रेम व्यक्त केले जाते.
दरवर्षी 7 फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो. प्रेमाचे प्रतीक म्हणून मानले जाणारे गुलाबाचे फुल देऊन एकमेकांविषयी आदर आणि प्रेम व्यक्त केले जाते. या दिवशी गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. गुलाबाचे फुल देऊन मनातील भावना व्यक्त केल्या जातात.