(फोटो सौजन्य: istock)
दरवर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. फक्त भारतातच नाही तर इतर अनेक देशात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या पार्टनरसह रोमँटिक ठिकाणांना भेट देत त्यांच्यासोबत मोकळा वेळ घालवतात तर काही त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. अधिकतर आपल्या एकमेकांबद्दलचे प्रेम यादिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात.
आता तुम्हीही नुकतेच प्रेमात पडला असाल आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोस करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रेमाची कबुली फक्त भावना व्यक्त करणेच नव्हे तर इतर गोष्टींचाही पुरेपूर विचार करायला हवा. जसे की एक चांगले ठिकाण. कोणतेही सुंदर ठिकाण आपल्या मनाला शांत करते. त्या ठिकाणचे सौंदर्य आपल्याला आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही रोमॅंटिक स्पॉट्सविषयी माहिती सांगत आहोत जिथे जाऊन तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली देऊ शकता. इथले सुंदर रोमँटिक वातावरण तुम्हाला एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यास मदत करतील.
महाबळेश्वर
सातारा जिह्यातील महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकांणांपैकी हे एक आहे. हे शहर मुंबई पासून 228 कि. मी. अंतरावर आहे. इथे तुम्ही धबधबे, संदुर दऱ्या, हिरवळ झाडे आणि सुंदर वातावरणाचा अनुभव घेऊ शकता. येथील फेमस ठिकाणांमध्ये विल्सन पॉइंट, लीग्नमाला धबधबा, एलीफंट पॉइंट, वेण्णा लेक, पंचगगा मंदिर, आर्थर सीट पॉइंट, कृष्णाबाई मंदिर यांचा समावेश आहे. निसर्गाच्या कुशीत लपलेल्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसह एक सुंदर मोकळा वेळ घालवू शकता.
अलिबाग
अलिबाग हे नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर समुद्रकिनारा दिसू लागतो. अलिबागला महाराष्ट्राचे मिनी गोवा असेही म्हटले जाते. अलिबागचे सीफूड फार प्रसिद्ध आहे. अक्षी, सासवणे, मांडवा, वरसोली, रेवस, कोरलई हे समुद्रकिनारे असलेले परिसर देखील अलिबागला लागून आहेत. इथल्या समुद्रकिनारी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला घेऊन जाऊन तुमच्या प्रेमाची कबुली देऊ शकता. निळेशार आकाश, थंड पाण्याच्या लाटा आणि मोकळी हवा या सर्वच गोष्टी तुमच्या मनाला उभारी आणतील आणि तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास तुम्हाला मदत करतील.
लवासा
पुण्याजवळ वसलेले लवासा हे ठिकाण महाराष्ट्रायील रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे. इथे तुम्ही तुमच्या पार्टनरसह खूप छान मोकळा वेळ घालवू शकता. हे ठिकाणं 7 टेकड्यांवर विस्तारलेले आहे. निर्मळ तलाव, युरोपियन शैलीतील वास्तुकला, सुंदर लॅंडस्केप यांसाठी हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. शांत वातावरणात आणि रोमॅंटिक गेटवेचा आनंद घ्यायचा असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. येथील घाणागड किल्ला, टेमघर धरण, वरसगाव धरण, प्रोमेनाड अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही भटकंती करू शकता.